साउथॅम्प्टन The Hundred League : इंग्लंडमध्ये सध्या 'द हंड्रेड क्रिकेट लीग' खेळवली जात आहे. या लीगचा 24 वा सामना साउथॅम्प्टनमधील द रोज बॉल क्रिकेट मैदानावर 'सदर्न ब्रेव्ह' आणि 'ट्रेंट रॉकेट्स' यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सदर्न ब्रेव्ह संघानं 2 गडी राखून विजय मिळवला. ट्रेंट रॉकेट्सचा स्टार गोलंदाज राशिद खानसाठी हा सामना खूपच वाईट होता. या सामन्यादरम्यान, निवृत्त फलंदाजानं एक असा पराक्रम केला जो रशीद आता विसरु शकणार नाही. या खेळाडूचं नाव आहे कायरॉन पोलार्ड, ज्यानं 2023 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.
Kieron Pollard hitting FIVE SIXES IN A ROW! 😱#TheHundred | #RoadToTheEliminator pic.twitter.com/WGIgPFRJAP
— The Hundred (@thehundred) August 10, 2024
राशिद खानसोबत काय झालं : 'द हंड्रेड क्रिकेट लीग'मध्ये 100-100 चेंडूंचे सामने होतात आणि एका षटकात 5 चेंडू असतात. या सामन्यात कायरॉन पोलार्डनं राशिद खानच्या एका षटकात 5 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. म्हणजे किरॉन पोलार्डनं रशीदच्या षटकातील प्रत्येक चेंडू सीमापार नेला. 'द हंड्रेड क्रिकेट लीग'च्या इतिहासात एका षटकात फलंदाजानं 5 षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. कायरॉन पोलार्डनं सदर्न ब्रेव्हच्या डावाच्या 17व्या षटकात ही कामगिरी केली.
कायरॉन पोलार्ड ठरला विजयाचा हिरो : या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या 100 चेंडूत 8 गडी गमावून 126 धावा केल्या. प्रत्युत्तरात सदर्न ब्रेव्ह संघानं हे लक्ष्य 99 चेंडूत 8 गडी गमावून पूर्ण केलं. यादरम्यान कायरॉन पोलार्डनं सदर्न ब्रेव्हसाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानं 23 चेंडूत 195.65 च्या स्ट्राईक रेटनं 45 धावा केल्या. कायरॉन पोलार्डच्या या खेळीत 2 चौकार आणि 5 षटकार आहेत. या दमदार खेळासाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आलं.
आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारले : टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग 6 षटकार मारणारा कायरॉन पोलार्ड हा देखील एक फलंदाज आहे. 2021 मध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अकिला धनंजयाविरुद्ध एकाच षटकात 6 षटकार मारले होते. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो युवराज सिंगनंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला. कायरॉन पोलार्ड जरी निवृत्त झाला असला तरी टी 20 क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीची आग कायम आहे.
हेही वाचा :