नवी दिल्ली Virat Kohli Deepfake Video : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे. दरम्यान, विराट कोहलीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात तो शुभमन गिलवर चिडलेला दिसत आहे. विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर कधी रागावलेला तर कधी संयम गमावताना दिसला असला तरी, अलीकडेच त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ खोटा आहे, जो AI च्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे.
हे वाचलं का :
काय म्हणतो विराट कोहली : वास्तविक, विराट कोहली या व्हायरल व्हिडिओमध्ये म्हणतो की, गिलचं तंत्र उत्कृष्ट आहे. पण त्याला माझ्यापुढं ठेवण्याची गरज नाही. लोक पुढच्या विराट कोहलीबद्दल बोलत आहेत. पण मला हे स्पष्ट करायचं आहे की एकच विराट कोहली आहे. मी ज्या सर्वात धोकादायक गोलंदाजांचा सामना केला आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे आणि एक दशकाहून अधिक काळ सातत्यानं असं केलं आहे. कोहली पुढे म्हणतो की भारतीय क्रिकेटमध्ये एक 'देव' (सचिन तेंडुलकर) आहे आणि त्याच्यानंतर मी आहे. हा एक बेंचमार्क आहे. गिलला तिथं पोहोचण्याआधी खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.
याआधीही विराट ठरला होता बळी : याआधीही विराट कोहली AI चा बळी ठरला आहे आणि त्याच्या फेक व्हिडिओमध्ये कोहली एका गेमिंगचा प्रचार करताना दिसत होता. त्याआधी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि त्याची मुलगी सारा तेंडुलकर यांचा डीपफेक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. कोहली आणि गिल मैदानावर हसताना, विनोद करताना आणि एकमेकांसोबतचे चांगले क्षण शेअर करताना दिसतात.
हेही वाचा :