नवी दिल्ली Vinesh Phogat Criticize : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील कुस्तीच्या अंतिम सामन्यात तिच्या 50 किलो वजनाच्या श्रेणीतील वजन मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं. यानंतर, तिने तिला सामायिक रौप्यपदक देण्यासाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) कडे अपील केलं, जे नाकारण्यात आलं आणि विनेशला कोणतंही पदक देण्यात आलं नाही.
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) August 16, 2024
विनेशनं 3 पानी निवेदन केलं जारी : CAS नं तिची याचिका फेटाळल्यानंतर, विनेश फोगटनं शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध केलं, ज्यात तिनं तिची जीवनकथा आणि कुस्ती प्रवास सांगितला आणि उच्च स्तरावर खेळ खेळण्यासाठी तिच्या संघर्षावर जोर दिला. पॅरिसमधील तिच्या मोहिमेदरम्यान विनेशनं तिच्या समर्थन करणाऱ्यांबद्दल आणि प्रशिक्षकांसाठी अतूट सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 29 वर्षीय तरुणीला वाटतं की ती 2032 पर्यंत खेळू शकते, यासह तिनं 2026 आणि 2032 ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा इशारा दिला.
काका महावीर फोगटला विसरली : विनेश फोगटच्या विधानाची खूप प्रशंसा झाली, परंतु तिचा मेहुणा आणि गीता फोगटचा नवरा पवन कुमार सरोहा हे थोडे नाराज आहेत. कारण त्यांना वाटतं की विनेशनं एका महत्त्वाच्या व्यक्तीचा उल्लेख केला नाही. पवन सरोहानं विनेश फोगटला तिचे काका महावीर फोगट यांच्या कुस्ती कारकिर्दीतील योगदानाची आठवण करून दिली. पवननं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं की, 'विनेश, तू खूप छान लिहिलं आहेस पण कदाचित आज तू तुझे काका महावीर फोगट यांना विसरली आहेस. ज्यांनी तुझी कुस्ती कारकीर्द सुरू केली. देव तुम्हाला शुद्ध बुद्धी देवो.
विनेश आपने बहुत ही बढ़िया लिखा है लेकिन शायद आज आप अपने ताऊ जी महावीर फोगाट को भूल गए हैं। जिन्होनें आपकी कुश्ती जीवन को शुरू किया था भगवान आपको शुद्ध बुद्धि दे ❤️🙏 https://t.co/BtQai2lcEp
— Pawan Saroha (@pawankumar86kg) August 16, 2024
कोण आहेत महावीर फोगट? : महावीर सिंग फोगट हे माजी भारतीय कुस्तीपटू आहेत आणि गीता आणि बबिता यांचे वडील, ज्या विनेश फोगटच्या चुलत बहिणी आहेत. लहान वयातच तिचे वडील वारल्यानंतर महावीरनं विनेशची काळजी घेतली आणि तिला कुस्ती शिकवली. महावीर फोगट यांच्या मार्गदर्शनाखाली विनेशनं कुस्तीची कौशल्ये आणि तंत्रं शिकून घेतली, ज्यामुळं ती तिच्या चुलत बहिणी गीता आणि बबिता फोगट यांच्यासह शीर्ष महिला कुस्तीपटूंपैकी एक बनली. 3 ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विनेश फोगटच्या कुस्ती कारकिर्दीत महावीरनं महत्त्वाची भूमिका बजावली. तसंच कॉमनवेल्थ गेम्समध्ये 3 सुवर्णपदकं आणि आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे.
हेही वाचा :