नवी दिल्ली Uruguayan Defender Passes Away : 27 वर्षीय उरुग्वेचा फुटबॉलपटू जुआन इझक्वेर्डो याचं बुधवारी निधन झाले. गेल्या आठवड्यात फुटबॉल खेळत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं जुआन मैदानावरच पडला होता. त्यानंतर त्याच्या उपचार सुरु होते. आता त्याच्या क्लब नॅशनलनं आपल्या सोशल मीडिया हँडलवर याची घोषणा केली आहे.
Con el más profundo dolor e impacto en nuestros corazones, el Club Nacional de Football comunica el fallecimiento de nuestro querido jugador Juan Izquierdo.
— Nacional (@Nacional) August 28, 2024
Expresamos nuestras más sinceras condolencias a su familia, amigos, colegas y allegados.
Todo Nacional está de luto por… pic.twitter.com/mYU28mqw6m
सोशल मीडियावर दिली माहिती : नॅशनलनं सोशल मीडियावर लिहिलं, "क्लब नॅशनलला त्याचा प्रिय खेळाडू जुआन इझक्विएर्डोच्या मृत्यूची घोषणा करताना खूप दुःख झालं आहे आणि धक्का बसला आहे." आम्ही त्यांचे कुटुंब, मित्र, सहकारी आणि प्रियजनांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांच्या कधीही भरुन न येणाऱ्या हानीमुळं नॅशनलचं संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालं आहे." याशिवाय साओ पाउलोनं 'फुटबॉलसाठी दु:खद दिवस' असं संबोधलं आहे. उरुग्वेच्या बचावपटूला गेल्या गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्यानंतर अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालयात नेण्यात आलं होतं. रुग्णालयानं एका निवेदनात म्हटलं की त्याला इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढल्यानं त्रास होत आहे. यानंतर 27 वर्षीय खेळाडू रविवारपासून व्हेंटिलेटरवर होता आणि सोमवारपासून न्यूरोलॉजिकल क्रिटिकल केअरमध्ये होता.
सामन्यातच आला हृदयविकाराचा झटका : त्याला मैदानावर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर देशातील प्रथम आणि द्वितीय विभागीय फुटबॉल लीग आठवड्याच्या शेवटी स्थगित करण्यात आल्या. रविवारी व्हिटोरियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान साओ पाउलो संघाच्या खेळाडूंनी त्याच्या समर्थनार्थ शर्ट घातले होते. गुरुवारी, साओ पाउलोविरुद्धच्या खेळाच्या 84व्या मिनिटाला इझक्विएर्डो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. गर्दीच्या टाळ्यांच्या कडकडाटात फुटबॉलपटूला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिकेतून मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्यानंतर त्याला अल्बर्ट आइनस्टाईन रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथं अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते.
हेही वाचा :
- आश्चर्यच...! एकाच सामन्यात दोन्ही संघाकडून खेळत केला अनोखा विक्रम, हे झालं तरी कसं? - MLB star Danny Jansen
- काय सांगता...! पाकिस्तान क्रिकेटमध्ये AI च्या माध्यमातून खेळाडूंची निवड? पीसीबी अध्यक्षांचं अजब वक्तव्य - Artificial intelligence in Cricket
- पाकिस्तानच्या जखमेवर मीठ... आधी बांगलादेशकडून लाजिरवाणा पराभव, आता ICC नं दिली मोठी शिक्षा - Pakistan vs Bangladesh Test