ETV Bharat / sports

टीम इंडिया लवकरच मुंबईत पोहोचणार, मिरवणुकीत वापरण्यात येणारी बस मरीन ड्राइव्हला पोहोचली! - Team india welcome - TEAM INDIA WELCOME

Team india welcome live updates
Team india welcome live updates (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 7:08 AM IST

Updated : Jul 4, 2024, 2:04 PM IST

राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते.

ईटीव्ही भारत वेबसाईट लिंक

LIVE FEED

2:00 PM, 4 Jul 2024 (IST)

टीम इंडिया लवकरच मुंबईत पोहोचणार, मिरवणुकीत वापरण्यात येणारी बस मरीन ड्राइव्हला पोहोचली!

भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीत वापरण्यात येणारी बस मरीन ड्राइव्हला पोहोचली. टीम इंडिया लवकरच दिल्लीहून मुंबईत पोहोचणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत भारतीय संघाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

1:12 PM, 4 Jul 2024 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाशी साधला संवाद

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडुंनी लोककल्याण मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. टीम इंडियाच्या सेलिब्रेशनसाठी टीमच्या जर्सीच्या रंगाचे केक आणण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडुंचे कौतुक केले. पंतप्रधानांच्या भेटीनंतर भारतीय खेळाडू मुंबईला येणार आहेत. मरिन ड्राईव्ह ते वानखेडे या मार्गावर खेळाडुंच्या विजयाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

12:14 PM, 4 Jul 2024 (IST)

मुंबईच्या खेळाडुंचा विधिमंडळात सत्कार व्हावा-प्रताप नाईक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, "मुंबईत आज बीसीसीआयनं कार्यक्रम आयोजित केला आहे. टीम इंडियात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल हे मुंबईचे खेळाडु आहेत. त्यांचा विधिमंडळात सत्कार व्हावा. मी एमसीएचे सदस्य आणि खेळाडूंना आमंत्रित केले होते. त्यांनी माझे आमंत्रण स्वीकारले आहे..

12:12 PM, 4 Jul 2024 (IST)

फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण भारतात क्रिकेट हा धर्म-जितेंद्र आव्हाड

मुंबईत वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडुंचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याबाबत एमसीएचे सदस्य जितेंद्र आव्हाड म्हणाले, " बऱ्याच काळानंतर भारतानं विश्वचषक जिंकला. विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटच्या भूमीवर त्यांचे स्वागत होणार आहे. फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण भारतात क्रिकेट हा धर्म आहे."

11:41 AM, 4 Jul 2024 (IST)

मुंबईत टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीसाठी एमसीएकडून जोरदार तयारी

मुंबईत टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीच्या तयारीबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी माहिती दिली. "एमसीएने क्रिकेटप्रेमींसाठी तयारी केली आहे. मुंबई पोलिस आणि बीसीसीआयच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रथम येणाऱ्यास प्रथम अशा पद्धतीनं विनामूल्य प्रवेश देणार आहोत. मुंबई पोलिसांसोबत एक बैठक घेतली आहे. आज भारतीय संघाचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे."

11:20 AM, 4 Jul 2024 (IST)

भारतीय क्रिकेट संघ थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट

भारतीय क्रिकेट संघ थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाची बस लोककल्याण मार्गावर पोहोचला आहे.

10:44 AM, 4 Jul 2024 (IST)

विराट कोहलीनं ITC मौर्य हॉटेलमध्ये केक कापून आनंद केला साजरा, थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींची घेणार भेट

T20 विश्वचषक विजयोत्सव साजरा करण्यासाठी विराट कोहलीनं दिल्लीतील ITC मौर्य येथे केक कापला. आयटीसी मौर्या बाहेर क्रिकेटचे चाहते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. भारतीय क्रिकेट संघ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी निघणार आहेत.

10:01 AM, 4 Jul 2024 (IST)

क्रिकेट संघाचा चाहता सुधीर चौधरी यांनी तिरंगा फडकावित व्यक्त केला आनंद

भारतीय क्रिकेट संघाचा चाहता सुधीर चौधरी यांनी दिल्लीतील ITC मौर्य येथे तिरंगा फडकावित आनंद व्यक्त केला. सुधीर चौधरी हे भारतीय संघाला नेहमीच प्रोत्साहित करतात. भारतीय क्रिकेट संघ हा आज मायदेशी परतल्यानंतर क्रिकेट चाहते आनंद व्यक्त करत आहेत.

8:57 AM, 4 Jul 2024 (IST)

भारतीय संघाचा बसमध्ये विजयोत्सव, बीसीसीआयकडून एक्स मीडियावर पोस्ट

भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर विजयाचा आनंदोत्सव आज साजरा करणार आहे. बसमधून प्रवास करताना भारतीय संघातील खेळाडुंनी चषक हातात घेऊन आनंद व्यक्त केला. यावेळी खेळाडुंचे कुटुंबीयदेखील बसमध्ये होते. बीसीसीआयनं भारतीय संघाचा व्हिडिओ एक्स मीडियावर पोस्ट केला.

7:54 AM, 4 Jul 2024 (IST)

भारतीय क्रिकेट संघासाठी आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये खास केक कापण्यात येणार

भारतीय क्रिकेट संघासाठी आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये एक खास केक कापण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे. भारतीय संघ विशेष विमानानं मुंबईत जाणार आहे. मुंबई विमानतळावर पोहोवरून भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचणार आहे. बीसीसीआयकडून नरिमन पॉईंट ते वानखेडे या 1 मार्गावर विजयी मिरवणुकीची व्यवस्था केली. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर एक छोटा समारंभ आयोजित केला जाणार आहे.

7:42 AM, 4 Jul 2024 (IST)

चाहत्याचं स्वागत पाहून भारावले भारतीय खेळाडू, विराट कोहलीनं बसमधून पाहत मोबाईलवरून केलं शूटिंग

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडुंनी बसमधून जाताना दिल्ली विमानतळावर जमलेल्या चाहत्यांची दखल घेतली. विराट कोहलीसह इतर खेळाडुंना चाहत्यांचे व्हिडिओ शूटिंग करण्याचा मोह आवरला नसल्याचं दिसून आले.

7:40 AM, 4 Jul 2024 (IST)

विराट कोहली आणि हार्दिक पांड्या ITC मौर्या हॉटेलमध्ये दाखल

विराट कोहली आणि हार्दिक पांड्या दिल्लीतील ITC मौर्या हॉटेलमध्ये दाखल झाले.

7:21 AM, 4 Jul 2024 (IST)

विराट-रोहितच्या जबरा फॅननं काढली रेखाचित्रे, पहाटेपासून भारतीय संघाची पाहतोय वाट

भारतीय क्रिकेट संघाचा चाहता शुभम हा पहाटेपासून क्रिकेट संघाच्या आगमनाची वाट पाहत होता. शुभमनं सांगितलं, " मी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची दोन रेखाचित्रे काढली आहेत. ट्रॉफीसह टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी मी पहाटे साडेचारच्या सुमारास विमानतळावर आलो. आम्ही खूप आनंदी आहोत"

7:00 AM, 4 Jul 2024 (IST)

टी२० विश्वविजेता भारतीय संघ मायदेशी परतला, क्रिकेट चाहत्यांची दिल्ली विमानतळावर तुफान गर्दी

टी२० विश्वविजेता भारतीय संघ आज विमानानं बार्बाडोस शहरातून मायदेशी परतला. चक्रीवादळामुळे भारतीय संघासह काही पत्रकार दक्षिण आफ्रिकेत अडकले होते. बीसीसीआयनं खासगी विमानानं भारतीय संघाला दिल्लीत परत आणलं आहे. भारतीय संघाचे स्वागत करण्याकरिता पहाटेपासून क्रिकेट चाहते प्रतिक्षा करत आहेत. विमानतळावर उतरताच खेळाडुंनी टी २० विश्वचषकासह छायाचित्रकारांना पोझ दिली. दिल्ली विमानतळावर चाहत्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली.

Last Updated : Jul 4, 2024, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.