मुंबई Team India Squad for Border Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघाच्या निवडीमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे मोहम्मद शमीची संघात निवड करण्यात आलेली नाही, जो अलीकडंच बेंगळुरु कसोटीनंतर सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासह गोलंदाजी करताना दिसला होता. शमी स्वत: सोशल मीडियावर सतत तंदुरुस्त असल्याच्या पोस्ट करुन व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळं त्याची निवड का झाली नाही अशी चर्चा क्रिकेटविश्वात सुरु आहे.
🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) October 25, 2024
Squads for India’s tour of South Africa & Border-Gavaskar Trophy announced 🔽#TeamIndia | #SAvIND | #AUSvIND pic.twitter.com/Z4eTXlH3u0
18 सदस्यीस संघाची घोषणा : भारतानं 22 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पाच कसोटी सामन्यांच्या दौऱ्यासाठी आपल्या 18 सदस्यीय संघात अभिमन्यू ईश्वरन, वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी या तीन नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. BCCI नं दिलेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि खलील अहमद यांना प्रवासी राखीव म्हणून संघात समाविष्ट केलं जाईल.
अभिमन्यू ईश्वरन ऑस्ट्रेलियात करणार पदार्पण : या मालिकेत रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करेल आणि जसप्रीत बुमराह उपकर्णधार असेल, रोहित वैयक्तिक कारणांमुळं पहिल्या दोन कसोटींपैकी एकाला मुकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत 29 वर्षीय अभिमन्यू या दौऱ्यावर कसोटीत पदार्पण करु शकतो. तो 2022 मध्ये बांगलादेशमध्ये भारताच्या कसोटी संघाचा एक भाग होता. ईश्वरन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्यानं दुलीप ट्रॉफीमध्ये दोन शतकं, इराणी ट्रॉफीमध्ये आणखी एक शतक झळकावलं आणि बंगालसाठी शतकासह रणजी ट्रॉफी हंगामाची सुरुवात केली.
India's squad highlights for Australia tour:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 25, 2024
- No Shami for the BGT.
- Easwaran picked as backup opener.
- Nitish Kumar Reddy picked for BGT.
- Axar & Shardul not picked for BGT.
- Rana and Prasidh picked.
- Kuldeep struggling with groin.
- Khaleel, Mukesh and Saini in reserves. pic.twitter.com/5W7JypGQis
अश्विन, जडेजा आणि सुंदर हे भारतीय संघातील 3 फिरकी अष्टपैलू खेळाडू : भारतानं आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या तीन फिरकी अष्टपैलू खेळाडूंची निवड केली आहे. 21 वर्षीय नितीश कुमार रेड्डी हा ऑस्ट्रेलिया संघातील एकमेव सीम-बॉलिंग अष्टपैलू खेळाडू आहे. मॅके आणि मेलबर्न इथं दोन चार दिवसीय सामने खेळणाऱ्या भारत अ संघाचा तो भाग असल्यानं त्याला जुळवून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल. रेड्डी, ज्यानं या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्ध T20 पदार्पण केलं आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी कसोटी संघात राखीव खेळाडू होता, तो आधीच ऑस्ट्रेलियात आहे.
संघात बुमराहसह चार वेगवान गोलंदाज : बुमराह व्यतिरिक्त मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध आणि राणा हे वेगवान गोलंदाज संघात आहेत. प्रसिधनं पहिल्या दोन कसोटी खेळल्या आहेत. दुखापतीनंतर तो संघात परतला आहे. तर 22 वर्षीय राणानं केवळ नऊ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. दिल्लीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राणानं सप्टेंबरमध्ये दुलीप ट्रॉफीमध्ये भारत डी संघासाठी दोनदा चार चार बळी घेतले आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 24.75 च्या सरासरीनं 36 बळी घेतले. खलील राखीव संघात आणि यश दयाल अनुपस्थित असल्यानं भारताकडे मुख्य संघात एकही डावखुरा वेगवान गोलंदाज नाही.
INDIA'S SQUAD FOR THE BORDER GAVASKAR TROPHY. 🇮🇳 pic.twitter.com/3HSS0WTySD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 25, 2024
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीचे 7 मुख्य मुद्दे :
- वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची संघात निवड झाली नाही.
- अभिमन्यू ईश्वरनची बॅकअप सलामीवीर म्हणून निवड झाली.
- नितीश कुमार रेड्डीला संघात स्थान मिळालं.
- अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांची निवड झाली नाही.
- हर्षित राणा आणि प्रसिध कृष्णाची निवड झाली.
- दुखापतीमुळं कुलदीप संघाचा भाग बनू शकला नाही.
- खलील अहमद, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांना राखीव ठेवण्यात आले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा (नोव्हेंबर-जानेवारी 2025) :
- 22-26 नोव्हेंबर : पहिला कसोटी सामना, पर्थ
- 6-10 डिसेंबर : दुसरा कसोटी सामना, ॲडलेड
- 14-18 डिसेंबर : तिसरा कसोटी सामना, ब्रिस्बेन
- 26-30 डिसेंबर : चौथा कसोटी सामना, मेलबर्न
- 03-07 जानेवारी : पाचवा कसोटी सामना, सिडनी
हेही वाचा :