मुंबई Team India Squad Announcement : भारतीय क्रिकेट संघ 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मार्च 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर भारताची ही पहिली कसोटी मालिका असेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. यासंघात अनेक नवीन खेळाडूं आहेत, ज्यांना निवडकर्ते परत आणू शकतात. गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच कसोटी मालिका असेल. गेल्या महिन्यात झालेल्या भारत-श्रीलंका दौऱ्यापूर्वी गंभीरला भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं होतं.
Indian Team Will Be Announced Next week ! 🇮🇳
— Ajay (@Ajay58808523528) September 4, 2024
✅Indian team for the Bangladesh Test series is set to announce next week. by [Sports Tak]#IndvsBan #India #INDvsBAN pic.twitter.com/UCKo75oQQb
कधी जाहीर होणार संघ : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार असून, त्याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) पुढील आठवड्यात भारतीय संघाची घोषणा करेल. विराट कोहलीसाठीही ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे, जो जानेवारी महिन्यानंतर या प्रकारात परतणार आहे. विराटनं या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिकाही खेळली नव्हती. वैयक्तिक कारणांमुळं त्यानं मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.
Indian team for the Bangladesh Test series is set to announce next week.#IndvsBan #TeamIndia pic.twitter.com/8A3tvH4ApG
— THE WINNERS CLUB (@twccricket) September 4, 2024
धाडसी फलंदाज परतणार : यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचं काही महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन निश्चित आहे. ऋषभ पंत शेवटच्या वेळी डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना खेळताना दिसला होता. तथापि, यानंतर एका भीषण कार अपघातात जखमी झाला होता. त्यानंतर त्यानं 2024 च्या आयपीएलमधून पुनरागमन केलं आणि त्यानंतर भारताला टी 20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अशा परिस्थितीत आता त्याचं भारतीय संघात पुनरागमन जवळपास निश्चित झालं आहे. पंतनं आतापर्यंत 33 कसोटी सामन्यांमध्ये 2271 धावा केल्या आहेत, ज्यात 5 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. ऋषभ पंत 2021 मध्ये गाबा इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संस्मरणीय विजयाचा नायक होता.
1) Rohit (C)
— Cricket minion (@AdityaChik60281) September 4, 2024
2) Gill (VC)
3) Kohli
4) Jaiswal
5) KL Rahul
6) Pant (WK)
7) Axar
8) Ashwin
9) Jadeja
10) Siraj
11) Bumrah
12) Jurel (WK)
13) Kuldeep
14) Arshdeep singh
15) Sarfraz khan
Probable squad for #indvsban test series🤔
What u think??
सरफराजला संधी मिळेल : सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना संघात स्थान मिळणार का, हे पाहणं बाकी आहे. या दोन्ही खेळाडूंनी वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत पदार्पण केलं होतं. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या त्रिकुटाचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. पंतशिवाय ध्रुव जुरेल हा दुसरा यष्टिरक्षक म्हणून संघाचा भाग असू शकतो. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज संघात राहणार हे निश्चित मानलं जात आहे. जसप्रीत बुमराह जर खेळला नाही तर त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा :