ETV Bharat / sports

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात, बांगलादेशविरुद्ध घेतला पराभवाचा बदला

U19 World Cup : अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं बांगलादेशचा 84 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघानं आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.

U19 World Cup
U19 World Cup
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 10:55 PM IST

ब्लूमफॉन्टेन (द. आफ्रिका) U19 World Cup : अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं शानदार सुरुवात केली आहे. शनिवारी (20 जानेवारी) ब्लोमफॉन्टेन येथे खेळल्या गेलेल्या गट-अ सामन्यात भारतीय संघानं बांगलादेशचा 84 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतानं सात गड्यांच्या मोबदल्यात 251 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात, बांगलादेशचा संघ 45.5 षटकांत 167 धावांवर गारद झाला. 76 धावांची खेळी करणारा आदर्श सिंग 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला.

भारताची प्रथम फलंदाजी : नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. भारतानं 31 धावांवर दोन गडी गमावले. यानंतर सलामीवीर आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन यांनी मिळून भारताचा डाव सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 23.5 षटकांत 116 धावांची भागीदारी केली. आदर्शनं 96 चेंडूत 6 चौकारांसह 76 धावा केल्या. सहारननं 94 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 64 धावांचं योगदान दिलं.

सौमी पांडेचे 4 बळी : भारतीय संघाचा फिनिशर सचिन धसनं डेथ ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी केली आणि 20 चेंडूत 26 धावा केल्या. या खेळीसह संघ 250 धावांचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला. बांगलादेशकडून डावखुरा वेगवान गोलंदाज मारूफ मृधानं 43 धावांत 5 बळी घेतले. बांगलादेशच्या संघानं 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीपासूनच विकेट गमावल्या. केवळ मोहम्मद सिहाब जेम्स आणि अरिफुल इस्लाम यांना काही काळ संघर्ष करता आला. सिहाबनं 54 धावांची तर अरफुलने 41 धावांची खेळी खेळली. भारताकडून सौमी पांडेनं 24 धावांत 4, तर मुशीर खाननं 2 बळी घेतले.

पराभवाचा बदला घेतला : या विजयासह भारतीय संघानं अंडर-19 आशिया कपमध्ये बांगलादेशकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. भारत अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाला झाला. त्या सामन्यात बांगलादेशनं टीम इंडियाचा चार गडी राखून पराभव केला होता. आता भारताच पुढील सामना 25 जानेवारीला रोजी आयर्लंडशी होणार आहे.

हे वाचलंत का :

  1. सचिन, विराट, विश्वनाथन आनंद; रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेला कोणकोणते खेळाडू येणार? जाणून घ्या संपूर्ण यादी
  2. 'साहेबां'विरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.