कानपूर WTC 2023-25 Points Table : श्रीलंकेच्या क्रिकेट संघानं अलीकडेच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये न्यूझीलंडला कसोटी मालिकेत पराभूत करुन भारतीय संघाचं गणित बिघडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तसंच पावसानंही हे गणित बिघडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण भारतीय संघ आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या दोन्ही प्रयत्नांना हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे. बांगलादेशविरुद्धची कानपूर कसोटी भारतानं 7 गडी राखत जिंकली आहे.
Yashasvi Jaiswal registers back to back fifties as #TeamIndia complete a successful chase in Kanpur 👏👏
— BCCI (@BCCI) October 1, 2024
Scorecard - https://t.co/JBVX2gyyPf#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/TKvJCkIPYU
फलंदाजीत केले अनेक विक्रम : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात कानपूर इथं मालिकेतील दुसरा कसोटा सामना खेळला गेला. त्यातील पहिले तीन दिवस पावसानं वाहून गेले. तीनही दिवस 35 षटकं खेळली गेली. पण हा सामना चौथ्या दिवशी पूर्णपणे खेळला गेला, ज्यात भारतीय संघानं गोलंदाजी आणि शानदार फलंदाजी करत सामन्यावर पकड निर्माण केली. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 233 धावांवर गडगडला होता. यानंतर भारतीय संघानं बेझबॉलपेक्षा आक्रमक खेळ खेळताना 9 बाद 285 धावा करुन डाव घोषित केला. अशा प्रकारे भारतीय संघानं पहिल्या डावात 52 धावांची आघाडी घेतली. भारतीय संघानं आपल्या फलंदाजीनं इतिहास रचला. भारतीय संघ आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50, 100, 150, 200 आणि 250 धावा पूर्ण करणारा संघ बनला आहे.
WTC फायनलमध्ये भारताचा मार्ग सोपा : कानपूर कसोटीनंतर भारतीय संघाला 2023-25 या WTC च्या मोसमात आणखी 8 सामने खेळावे लागणार आहेत. बांगलादेशला पराभूत केल्यामुळं आता भारतीय संघाला उरलेल्या 8 पैकी फक्त 4 सामने जिंकावे लागणार आहेत. यामुळं कोणत्याही संघाच्या विजय किंवा पराभवावर अवलंबून राहावं लागणार नाही आणि त्यांनी अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित जवळपास निश्चित केलं आहे.
आणखी खेळणार आठ सामने : भारतीय संघाला पुढील 8 सामने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहेत. किवी संघाविरुद्ध 3 सामन्यांची मायदेशात कसोटी मालिका होणार आहे. तर कांगारु संघाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. जर कानपूर कसोटी अनिर्णित राहिली असती, तर त्या स्थितीत भारतीय संघाला 8 पैकी 5 सामने जिंकण्याची आवश्यकता होती. मात्र आता त्याची गरज नाही.
WTC पॉइंट सिस्टम :
- विजयानंतर 12 गुण
- सामना बरोबरीत सुटल्यास 6 गुण
- सामना अनिर्णित राहिल्यास 4 गुण
- जिंकलेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित संघांची क्रमवारी लावली जाते.
- अव्वल दोन संघ 2025 मध्ये लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम फेरीत पोहोचतील.
- स्लोओव्हर दर असल्यास गुण वजा केले जातात.
हेही वाचा :