ETV Bharat / sports

बारावीची परीक्षा दिलेल्या खेळाडूला संघात स्थान; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

India Aquad Announced
भारतीय क्रिकेट संघ (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : 3 hours ago

मुंबई India Aquad Announced : भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये उभय संघांमधील 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या महिला निवड समितीनं 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती असेल तर स्मृती मानधना उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. यास्तिका भाटिया आणि ऋचा घोष या दोन यष्टीरक्षकांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

शेफाली वर्माला संघात स्थान नाही : निवड समितीनं पुन्हा एकदा 20 वर्षीय उजव्या हाताची फलंदाज शेफाली वर्माला संधी दिली नाही. तिचा अलीकडचा वनडे फॉर्म निराशाजनक आहे. शेफालीनं यावर्षी 6 सामन्यांत केवळ 108 धावा केल्या असून त्यापैकी 33 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेत खराब कामगिरीमुळं त्याला संघातून वगळण्यात आलं होतं.

कधीपासून होणार मालिका : 5 डिसेंबरपासून या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर दुसरा सामना 8 डिसेंबरला तर मालिकेतील शेवटचा सामना 11 डिसेंबरला होणार आहे. पहिले दोन वनडे सामने ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर फील्डवर खेळवले जातील, त्यानंतर मालिकेतील अंतिम सामना पर्थमधील WACA मैदानावर खेळवला जाईल, जे ICC महिला चॅम्पियनशिपचा भाग आहे. अलीकडेच भारतीय महिला संघानं न्यूझीलंडला मायदेशात वनडे मालिकेत 2-1 नं पराभूत केलं होतं आणि आता ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्याकडं लक्ष असेल. मात्र, भारतीय संघासाठी हे इतकं सोपं नसेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचं पूर्ण वेळापत्रक

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिला वनडे : 5 डिसेंबर, ब्रिस्बेन (भारतीय वेळेनुसार सकाळी 9.50 वाजता)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरा वनडे : 8 डिसेंबर, ब्रिस्बेन (भारतीय वेळेनुसार सकाळी 5.50 वाजता)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरा वनडे :11 डिसेंबर, पर्थ (भारतीय वेळेनुसार सकाळी 9.50 वाजता)

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), रिचा घोष (यष्टिरक्षक), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा , मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तीतास साधू, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, सायमा ठाकूर.

हेही वाचा :

  1. पाकिस्तानला हरवत ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास, न्यूझीलंडचा मोठा विक्रम इतिहासजमा
  2. पाकिस्तानमध्ये खेळाडूंच्या हॉटेलला भीषण आग, थोडक्यात बचावले क्रिकेटपटू; मोठी स्पर्धा रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.