मुंबई Teachers Day 2024 : 5 सप्टेंबर हा दिवस सर्व भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येते. या दिवशी सर्व शिक्षकांचा सन्मान करून हा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. कुठल्याही क्षेत्रात शिक्षकाची भूमिका ही महत्त्वाची आहे, मग ते क्रीडा असो की करमणूक, शिक्षण असो की आरोग्य शिक्षक हा नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतो. क्रिकेटवेड्या असलेल्या आपल्या देशात असे अनेक दिग्गज क्रिकेटपटू झाले आहेत, त्यांनी देशासाठी क्रिकेट खेळल्यानंतर देशाच्या राष्ट्रीय संघाला मुख्य प्रशिक्षकांच्या रुपात मार्गदर्शनही केलं आहे. म्हणजेच एक प्रकारे ते शिक्षक झाले आहेत तर अशाच काही प्रमुख प्रशिक्षकांबद्दल जाणून घेऊया.
कपिल देव : 1983 विश्वचषक विजेता संघाचे कर्णधार आणि महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव 1999 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. मात्र त्यांच्या कार्यकाळात भारताला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दुर्दैवानं त्यांच्यावर झालेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी क्रिकेट जगताला हादरवून सोडलं. परिणामी याच दबावामुळं त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
अनिल कुंबळे : दोन वेगवेगळ्या आयपीएल संघांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणारे महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे भारतीय क्रिकेट संघाचा पहिला पूर्णवेळ प्रशिक्षक ठरले. कपिल देव यांनी सप्टेंबर 2000 मध्ये राजीनामा दिल्यानंतर अनिल कुंबळेंवर ही जबाबदारी सोपविण्यात आली.
संदीप पाटील : संदीप पाटील कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाचा सदस्य होते, ज्यांनी 1983 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. 1996 मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी (मे-जुलै) भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून या मधल्या फळीतील फलंदाजाची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु भारतानं कसोटी आणि एकदिवसीय मालिका दोन्ही गमावल्यामुळं ते विस्मरणाचं ठरलं आणि पाटील यांना अखेरीस काढून टाकण्यात आले.
मदन लाल : माजी वेगवान गोलंदाज मदन लाल यांची 1996 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळात भारतानं ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत केलं. परंतु, वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
अंशुमन गायकवाड : दिवंगत अंशुमन गायकवाड यांच्या कोचिंग कार्यकाळात (1997 ते 1999), भारतानं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खरोखरच चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे अनिल कुंबळेच्या कसोटी सामन्याच्या एका डावातील 10 विकेट्सचा विश्वविक्रमही त्यांच्याच काळात आला. गायकवाड यांनी कठीण काळात मदन लाल यांची जागा घेतल्यानंतर चांगलं काम केलं.
रवी शास्त्री : माजी दिग्गज क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी कर्णधार विराट कोहलीशी उत्कृष्ट संबंध जोपासत संघ संचालक म्हणून त्यांनी 2015-16 मध्ये चांगलं काम केले. त्यांच्या कारकिर्दीच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये भारतानं अल्प कालावधीसाठी (आठ आठवडे) कसोटींमध्ये पहिल्या क्रमांकावर पुन्हा दावा केला, दोन विश्वचषक उपांत्य फेरी गाठली आणि ऑस्ट्रेलियामध्ये (T20 मालिका) ऑस्ट्रेलियाला 3-0 नं पराभूत केले आहे. तसंच घरच्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी केली आणि भारतीय संघ सलग 14 कसोटीत अपराजित राहिला.
गौतम गंभीर : 42 वर्षांचा गौतम गंभीर, भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात तरुण मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं राहुल द्रविडची जागा घेतली. ज्याचा कार्यकाळ नुकत्याच संपलेल्या T20 विश्वचषकानं संपला. द्रविडनं त्याच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी मुदतवाढ नाकारली. यासाठी गौतम गंभीरची बिनविरोध निवड झाली.
हेही वाचा :