ETV Bharat / sports

टी20 विश्वचषक स्पर्धा 2024 : रोहित शर्मा टी20 फॉरमॅटचा 'बेताज बादशाह', 'असा' विक्रम करणारा बनला पहिला कर्णधार - T20 World Cup 2024 - T20 WORLD CUP 2024

T20 World Cup 2024 : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर अनेक विक्रम नोंदले गेले आहेत. यात आता आणखी विक्रमाची भर पडली आहे. रोहित शर्मा हा टी20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार ठरला आहे.

T20 World Cup 2024
कर्णधार रोहित शर्मा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 9:41 AM IST

नवी दिल्ली T20 World Cup 2024 : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषक टी20 स्पर्धेत खेळत आहे. विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारतानं आयर्लंडविरुद्ध विजय मिळवला. मात्र हा विजय मिळवताच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं महेंद्र सिंग धोनीला मागं टाकत आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित शर्मा हा टी20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार झाला आहे.

टी20 विश्वचषकात सर्वाधिक विजय : रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळताना भारतीय क्रिकेट संघानं अनेक विक्रमी विजय मिळवले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळताना भारतीय संघानं टी20 विश्वचषकात बुधवारी आयर्लंडच्या संघाला हरवलं. विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारतीय संघानं विजय संपादन केला. भारतीय संघानं हा विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माच्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला गेला. रोहित शर्मानं टी20 फॉरमॅटमध्ये खेळताना 42 वेळा विजय मिळवला आहे. या अगोदर हा विक्रम महेंद्र सिंग धोनी याच्या नावावर होता. रोहित शर्मानं आतापर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये 300 विजय मिळवून दिले आहेत. मात्र महेंद्र सिंग धोनीचा विक्रम अद्यापही रोहित शर्मा याला मोडता आला नाही.

रोहित शर्मा 600 षटकार ठोकणारा पहिला खेळाडू : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. रोहित शर्मानं टी20 फॉरमॅटमध्ये खेळताना जोरदार प्रदर्शन केलं आहे. त्यानं आतापर्यंत 600 ठोकून आपली क्षमता सिद्ध केली आहे. रोहित शर्मा हा 600 षटकार ठोकणारा आतंरराष्ट्रीय पातळीवर एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याच्या या विक्रमाच्या जवळ अद्याप कोणताही खेळाडू फिरकू शकला नाही. यासह रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय पातलीवर टी20 फॉरमॅटमध्ये खेळताना तब्बल 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात या विक्रमापासून रोहित शर्मा हा 37 धावांपासून दूर होता. मात्र त्यानं 52 धावा ठोकून या विक्रमाला गवसणी घातली. त्यामुळे रोहित शर्मा हा टी20 विश्वचषकात 1 हजार धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसरा फलंदाज ठरला.

टी20 फॉरमॅटमध्ये 4 हजार धावा : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं टी20 फॉरमॅटमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वाधिक जलद 4 हजार धावा करणारा रोहित शर्मा हा पहिला खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मानं मर्यादित षटकाच्या स्पर्धेत सर्वात जलद 100 षटकार मारणारा फलंदाजही ठरला आहे. त्यामुळे रोहित शर्मा यानं आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात विविध विक्रमाला गवसणी घातली. भारतीय संघाचा आगामी सामना पाकिस्तान संघासोबत 9 जूनला होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर खिळल्या आहेत.

हेही वाचा :

  1. "एक्सक्लुसीव्ह कंटेंट मिळवून टीआरपीसाठी धडपड यामुळं..."; रोहित शर्मानं आयपीएल ब्रॉडकास्टरला फटकारलं - Rohit Sharma
  2. रो'हिट'मॅन शर्माच्या नावावर नवा विक्रम, 'अशी' कामगिरी करणारा आशियामधील ठरला पहिला खेळाडू - Rohit Sharma
  3. 'बुटका डोंगराच्या माथ्यावर उभा राहिला तरी बुटका असतो, मात्र...'; मुंबईच्या कर्णधारपदाबाबत काय म्हणाले नवज्योत सिंग सिद्धू? - Navjot Sidhu on Rohit Sharma

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.