T20 World Cup 2024 Final IND vs SA : आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट 2024 स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून (शनिवार) रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बार्बाडोस इथं खेळवला जाईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 11 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. भारताला 11 वर्षांपासून कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात यश आलं नाहीय. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. या सामन्यात रोहित शर्मा भारताची कमान सांभाळणार आहे तर ॲडम मार्कराम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करताना दिसणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ या स्पर्धेत अपराजित आहेत. त्यामुळं अंतिम सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
𝙄𝙣𝙩𝙤 𝙏𝙝𝙚 𝙁𝙞𝙣𝙖𝙡𝙨! 🙌 🙌#TeamIndia absolutely dominant in the Semi-Final to beat England! 👏 👏
— BCCI (@BCCI) June 27, 2024
It's India vs South Africa in the summit clash!
All The Best Team India! 👍 👍#T20WorldCup | #INDvENG pic.twitter.com/yNhB1TgTHq
2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतानं ग्रुप स्टेजमध्ये 3 विजय, सुपर-8 टप्प्यात 3 विजय आणि उपांत्य फेरीत इंग्लंडवर विजय मिळवून आपली अपराजित मोहीम कायम ठेवली. यासोबतच दक्षिण आफ्रिकेनंही ग्रुप स्टेजमध्ये 4 विजय, सुपर-8 टप्प्यात 3 आणि सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानला पराभूत करुन आपली अपराजित मोहीम सुरू ठेवली आहे. फानलमध्ये जो संघ बाजी मारणार त्या संघाच्या नावावर एकही सामना न गमावता टी-20 विश्वचषक जिंकल्याचा रेकॅार्ड होणार आहे.
🟡🟢 FINAL BOUND | #SAvAFG
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 27, 2024
The dream continues, South Africa! ✨🇿🇦🚀
📖 For the first time in history, the Proteas are through to the ICC T20 World Cup Final. See you in Barbados! 🏟️#WozaNawe #BePartOfIt#OutOfThisWorld #T20WorldCup pic.twitter.com/yW7n6vgyrI
हेड टू हेड रेकॉर्ड : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत भारतानं 14 सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेनं 11 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघांमधील एक सामना अनिर्णित राहिला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले गेले आहेत. या 6 टी-20 सामन्यांपैकी भारतानं 4 सामने जिंकले आहेत, तर आफ्रिकेनं फक्त 2 सामने जिंकले आहेत. हेड टू हेड रेकॉर्ड मध्ये भारताचा वरचष्मा राहीलाय.
South Africa: 𝗪 𝗪 𝗪 𝗪 𝗪 𝗪 𝗪 𝗪
— CricTracker (@Cricketracker) June 27, 2024
India: 𝗪 𝗪 𝗪 N/R 𝗪 𝗪 𝗪 𝗪
Two unbeaten teams meet each other in the final 🏆#T20WorldCup2024 pic.twitter.com/JKSHTAUltH
आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्माच्या सर्वाधिक धावा : भारतासाठी रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहितनं या संघाविरुद्ध 16 डावात 420 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत रोहितनंतर सूर्यकुमार यादवचा क्रमांक लागतो, ज्यानं आतापर्यंत आफ्रिकेविरुद्ध केवळ 6 सामन्यात 68.6 च्या उत्कृष्ट सरासरीनं 343 धावा केल्या आहेत.
That was one clinical show in the Semi-Final! 👌 👌
— BCCI (@BCCI) June 27, 2024
📸 📸 Summing up that win! #T20WorldCup | #TeamIndia | #INDvENG pic.twitter.com/kHdOIZ1Q9n
पावसामुळं सामना रद्द झाल्यास विजेता कोण? : शनिवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेतेपदाच्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणल्यास रविवारी हा सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. मात्र रविवारीही पावसामुळं सामना वेळेवर होऊ शकला नाही, तर त्यासाठी आयसीसीनं अतिरिक्त 190 मिनिटं ठेवली आहेत. या वेळेतही जर पावसानं खेळ होऊ दिला नाही आणि अंतिम सामना पावसामुळं रद्द झाला, तर अशा परिस्थितीत भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना स्पर्धेचे संयुक्त विजेता घोषित केलं जाईल. 17 वर्षांच्या टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत संयुक्त विजेता घोषित झालेला नाही.
🎯Shoutout to the impeccable bowling by the Proteas in the #T20WorldCup Semi-Final☄️🇿🇦🏏🇦🇫 #SAvAFG
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 27, 2024
Credit: Getty/ ICC #OutOfThisWorld #BePartOfIt #WozaNawe pic.twitter.com/55Jkqn8tF6
दोन्ही संघ
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिके संघ : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नोर्किया आणि तबरेझ शम्सी.
हेही वाचा
- टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट; सामना न झाल्यास कोण होणार विश्वविजेता? - T20 World Cup Final
- भारताच्या शेफाली वर्मानं रचला इतिहास...! महिलांच्या कसोटी सामन्यात केला 'हा' भीम पराक्रम - INDW vs SAW Only Test
- टी20 विश्वचषक 2024 : कर्णधार म्हणून रोहित शर्माचा मोठा विक्रम, विराट कोहलीबाबत केलं मोठं वक्तव्य - Rohit Sharma Records