बेलफास्ट Sri Lanka Women vs Ireland Women : आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बेलफास्ट येथील सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब इथं सुरु आहे. चमारी अथापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघ नक्कीच सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. तर गॅबी लुईसच्या नेतृत्वाखाली आयरिश संघ एकदिवसीय मालिकेत आत्मविश्वासानं उतरेल अशी आशा असेल. हा सामना पाहण्यासाठी भारतात लाइव्ह टेलिकास्टचा पर्याय उपलब्ध नाही, (where to watch sri lanka women vs ireland women's national cricket team) मात्र फॅनकोडवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध आहे ही चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. जिथे चाहत्यांना मॅच पास घेऊन लाईव्ह टेलिकास्टचा आनंद घेता येईल. या सामन्यात आयर्लंड महिला संघानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. (scotland women vs netherlands women)
👋 | WELCOME
— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) August 16, 2024
It's match day between Ireland and Sri Lanka in this first women's ODI at Stormont!
The weather is fair and first ball is expected at 10.45am.
While you're waiting, why not read our FREE digital match programme: https://t.co/sumpTZonNm
Let's be #BackingGreen… pic.twitter.com/SyPlrdqs4K
श्रीलंकेनं केली प्रथम फलंदाजी : यानंतर प्रथम फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर श्रीलंकेच्या महिलांनी शानदार फलंदाजी करत 50 षटकांत 8 बाद 260 धावा केल्या. यात विश्मी गुणारत्नेनं शकत झळकावलं. तिनं अवघ्या 98 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 101 धावा केल्या. तिच्याशिवाय हैसिनी परेरानंही 46 धावांचं योगदान दिलं. तर आर्यलॅंडकडून ओर्ला प्रेंनडर्गेस्टनं 3 विकेट घेतल्या. आता आयरिश महिलांचा हा सामना जिंकत तिन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांच्या टी 20 मालिकेत दोन्ही संघानं एक-एक सामना जिंकत मालिका बरोबरीत राखली होती.
दुसरी श्रीलंकन महिला : विशेष म्हणजे श्रीलंकेची विश्मी गुणरत्ने एकदिवसीय शतक झळकावणारी दुसरी श्रीलंकन महिला बनली आहे. याआधी फक्त कर्णधार चमारी अथापथूनं श्रीलंकेकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं होतं.
हेही वाचा :
- फलंदाज सुस्त, गोलंदाज मस्त... कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पडल्या 17 विकेट - WI vs SA test
- स्वातंत्र्यदिनी सुरु होणार 2 मोठ्या क्रिकेट स्पर्धा; भारतीय संघाचे 'हे' दिग्गज खेळणार, राहुल द्रविडचा मुलगाही उतरणार मैदानात - Maharaja Trophy
- पदार्पणाच्याच सामन्यातच 'या' भारतीय गोलंदाजानं घेतल्या 5 विकेट; संघाला मिळवून दिला एकहाती विजय - Northamptonshire