गॉल (श्रीलंका) Sri Lanka vs New Zealand 2nd Test Live Streaming : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 26 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना गॉले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. श्रीलंकेनं दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यजमान संघानं पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा 63 धावांनी पराभव केला. या सामन्यात किवी संघाला दुसऱ्या डावात 276 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाचा डाव 211 धावांवर गारद झाला. अशा स्थितीत श्रीलंकेची नजर आता दुसरी कसोटी जिंकून मालिकेवर कब्जा करण्यावर असेल. त्याचबरोबर हा दुसरा कसोटी सामना जिंकून न्यूझीलंड संघाला मालिकेत बरोबरी साधायची आहे. हा कसोटी सामनाही अतिशय रोमांचक होण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांमध्ये हेड-टू-हेड रेकॉर्ड : श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 39 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात न्यूझीलंड संघानं 18 कसोटी सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेनं 10 कसोटी जिंकल्या आहेत. याशिवाय 11 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. श्रीलंकेनं घरच्या मैदानावर खेळताना न्यूझीलंडला 8 कसोटी सामन्यांमध्ये दारुण पराभव पत्करावा लागला आहे. तर पाच कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेत दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या 5 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.
The hosts take a 1-0 lead in the series at Galle. Test 2 starts at the same venue on Thursday. Scorecard | https://t.co/GKXGrmg9k6 #SLvNZ pic.twitter.com/USMmLEkxnG
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 23, 2024
लंकेचा संघ 2009 पासून न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकू शकलेला नाही : आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 18 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. यात श्रीलंकेनं 4 कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि न्यूझीलंड संघानं 8 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. याशिवाय 6 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. श्रीलंकेचा संघ गेल्या 15 वर्षांत न्यूझीलंडविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. शेवटच्या वेळी 2009 मध्ये श्रीलंकेनं न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 2-0 नं जिंकण्यात यश मिळविलं होतं.
The second best Test figures by a New Zealand bowler in Sri Lanka and joining Sir Richard Hadlee as the only New Zealand bowlers with multiple Test five wicket hauls in Sri Lanka. Scorecard | https://t.co/yQbOShzxtb #SLvNZ pic.twitter.com/LynmewNEsc
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 23, 2024
- श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (26 सप्टेंबर 2024) खेळवला जाणार आहे.
- श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठं खेळवला जाईल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
- श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना किती वाजता खेळवला जाईल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10.00 वाजता सुरु होईल. त्याची नाणेफेक अर्धा तास आधी सकाळी 9.30 वाजता होईल.
- श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना तुम्ही टीव्हीवर कुठं पाहू शकता?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतातील सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.
- श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहता येईल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लाइव्ह ॲप आणि फॅनकोड ॲपवर केलं जाईल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
- श्रीलंका : धनंजय डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, सदिरा समरविक्रम, ओशादा फर्नांडो, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो, लाहिरु कुमार, लाहिरू कुमारा, प्रभात जयसूर्या, रमेश मेंडिस, जेफ्री वेंडरसे, मिलन रथनायके
- न्यूझीलंड : टीम साऊदी (कर्णधार), टॉम लॅथम (उपकर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे (यष्टिरक्षक), मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल्यम ओ'रुर्क, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, केन विल्यमसन, विल यंग
हेही वाचा :