दांबुला (श्रीलंका) SL vs NZ 1st T20I Live Streaming : श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दांबुला येथील रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
Next up: white ball cricket in Sri Lanka!
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 7, 2024
Watch all matches LIVE in NZ on @skysportnz 📺 LIVE scoring at https://t.co/3YsfR1YBHU or the NZC app 📲 #SLvNZ #CricketNation #Cricket pic.twitter.com/qKb8z4usu9
घरच्या मैदानावर श्रीलंकेची चमकदार कामगिरी : T20 विश्वचषकापासून श्रीलंका संघ घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करत आहे. श्रीलंकेनं नुकतंच T20 आणि वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-1 असा पराभव केला. अशा परिस्थितीत श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा न्यूझीलंडला तगडे आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघ भारताला कसोटी मालिकेत 3-0 नं पराभूत करुन या मालिकेत प्रवेश करेल. श्रीलंकेला घरच्या मैदानावर पराभूत करणं किवी संघासाठी इतकं सोपं नसेल. परिणामी दोन्ही संघांमध्ये रोमांचक मालिका पाहायला मिळणार आहे.
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 9 नोव्हेंबर, दांबुला
- दुसरा T20 सामना : 10 नोव्हेंबर, दांबुला
Captains assemble! The two-match T20I series against Sri Lanka starts tomorrow morning at 2:30am NZT. Follow play LIVE in NZ on @skysportnz 📺 LIVE scoring at https://t.co/3YsfR1YBHU or the NZC app 📲 #SLvNZ #CricketNation 📸 = SLC pic.twitter.com/fLOTOu2E56
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 8, 2024
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : श्रीलंका आणि न्यूझीलंडचे संघ T20 मध्ये 23 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात न्यूझीलंडचा वरचष्मा दिसत आहे. यात न्यूझीलंडनं 13 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेनं 9 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. यावरुन किवी संघ अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं. मात्र, श्रीलंकेला घरच्या मैदानावर पराभूत करणं इतकं सोपं नसेल.
खेळपट्टी कशी असेल : दांबुला येथील खेळपट्टी सामान्यतः फिरकीपटूंना अनुकूल असते, कारण तिची खेळपट्टी कोरडी असते आणि कमी उसळीची असते. त्यामुळं धावा काढणं हे फलंदाजांसाठी थोडं आव्हानात्मक ठरु शकतं. याशिवाय वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये नव्या चेंडूनं स्विंगही मिळू शकतो. मात्र, हा रात्रीचा खेळ असल्यानं चेंडू अधिक चांगल्या प्रकारे बॅटवर येऊ शकतो. तसंच नाणेफेक जिंकणारा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
New faces in Dambulla 📍 #SLvNZ #CricketNation pic.twitter.com/Y42djSeokR
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 7, 2024
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना कधी खेळला जाईल?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना आज म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता दांबुला येथील रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. तर याच्या अर्धा तासआधी नाणेफेक होईल.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना कुठं आणि कसा पहायचा?
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड T20I मालिका 2024 भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर प्रसारित केली जाईल. याशिवाय या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लाइव्ह ॲप आणि फॅनकोड ॲपवर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना इथून पहिल्या T20 सामन्याचा आनंद घेता येईल.
Home after making history! 🏏
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 7, 2024
The first Test players returned to Aotearoa yesterday following the historic Test series win over India. The Test team is back in action in a three-Test series against England Cricket starting at Hagley Oval on November 28. #CricketNation pic.twitter.com/1ZYg1FbM1h
सामन्यासाठी दोन्ही संघ :
न्यूझीलंड संघ : टिम रॉबिन्सन, विल यंग, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिच हे (यष्टिरक्षक), मिचेल सँटनर (कर्णधार), जोश क्लार्कसन, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, झॅचरी फॉल्केस, नॅथन स्मिथ, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डीन फॉक्सक्रॉफ्ट
श्रीलंका संघ : पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), कुसल परेरा, दिनेश चंडीमल, चारिथ असालंका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालेज, असिथा फर्नांडो, नुवान थुशारा, मथिशा पाथिराना, बिनुरा फर्नांडो, बिनुरा फर्नांडो, मथिशा पथिराना वांडरसे, कामिंदू मेंडिस, चामिंडू विक्रमसिंघे, महेश थिक्षणा
हेही वाचा :