सेंच्युरियन SA vs PAK 2nd T20I Live Streaming : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा T20 सामना आज 13 डिसेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क इथं होणार आहे.
🟢🟡Match Result
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 10, 2024
What a start to the Series!😮💨
🇿🇦South Africa win by 11 runs down in Durban.
The Proteas take a 1-0 lead in the 3-Match KFC T20i Series, as they head up to Pretoria next.🏟️😁🏏#WozaNawe#BePartOfIt #SAVPAK pic.twitter.com/uqQlJwZsMT
पहिल्या T20 सामन्यात काय झालं : पहिल्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 8 गडी गमावून केवळ 172 धावा करु शकला. यासह यजमान संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिका मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, पाकिस्तान संघ दुसऱ्या वनडेत पुनरागमन करु इच्छितो. परिणामी दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. यापुर्वी दक्षिण आफ्रिकेनं 2018/2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध T20 मालिका जिंकली होती. त्यानंतर आता हा सामना जिंकत आफ्रिकेला 6 वर्षांनी पाकिस्तानविरुद्ध मालिका जिंकण्याची संधी असेल.
The cat is out the bag🫢
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 11, 2024
George Linde may have missed the bus for the match, but he still TURNED UP for the Proteas in a big way, with a “Man of the Match” performance.😃👏🏏
Maybe being late is the secret?🤔😏#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/G7AgZAhHGA
दोन्ही संघातील हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 23 आंतरराष्ट्रीय T20 सामने झाले आहेत. त्यापैकी पाकिस्ताननं 12 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेनं 11 सामने जिंकले आहेत. यात सध्या पाकिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. पण दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे नाही.
1️⃣5️⃣ overs down.
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 10, 2024
🇵🇰Pakistan are 111/4 now.
They require 73 runs off the last 5 overs.
An entertaining end to the match is in store!😏👏🏏#WozaNawe#BePartOfIt #SAVPAK pic.twitter.com/sJTdDNWR4R
सुपरस्पोर्ट पार्कची खेळपट्टी कशी असेल : सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्कमधील खेळपट्टी सामान्यत: चांगली उसळी देते आणि चेंडू सामान्य ट्रॅकपेक्षा वेगानं बॅटपर्यंत पोहोचतो. त्यामुळंच हे स्टेडियम वेगवान गोलंदाजांसाठी चांगलं मानलं जातं. विशेषत: नवीन चेंडू फलंदाजांना अधिक त्रास देऊ शकतो. पण ही विकेट फलंदाजीसाठीही चांगली मानली जाते. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो, जेणेकरुन प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला कमी धावसंख्येपर्यंत रोखता येईल.
या मैदानावर नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 सामना खेळवण्यात आला. ज्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 219 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 208 धावा करु शकला.
1️⃣0️⃣ overs down.
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 10, 2024
🇵🇰Pakistan are 78/3 at the halfway mark.
They require 106 more off 60 balls.
GAME ON!💥🏏#WozaNawe#BePartOfIt #SAVPAK pic.twitter.com/s4lPuC6Ro7
सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवरील T20 सामन्यांची आकडेवारी कशी : मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 18 T20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 9 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं 9 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय एक सामना बरोबरीत किंवा अनिर्णित राहिला आहे.
कोणत्या संघाची सर्वोच्च धावसंख्या : सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेनं सर्वोच्च सांघिक धावसंख्या केली आहे. 26 मार्च 2023 रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं 4 गडी गमावून 259 धावा केल्या होत्या. याशिवाय दक्षिण आफ्रिकेनंच या मैदानावर सर्वात कमी धावा केल्या आहेत. 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानविरुद्ध 100 धावांपर्यंत मर्यादित होता.
End of the Powerplay.
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 10, 2024
🇵🇰Pakistan are 55/1 after the first 6 overs.
They need 129 more runs.#WozaNawe#BePartOfIt #SAVPAK pic.twitter.com/DELyXnU44j
सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर सर्वाधिक धावा आणि विकेट कोणाच्या नावावर आहेत?
सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेननं सर्वाधिक धावा केल्या आहेत. हेनरिक क्लासेननं 8 T20 सामन्यांमध्ये 219 धावा केल्या आहेत, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. या मैदानावर हेनरिक क्लासेनची सरासरी 31.28 आहे. याशिवाय सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस्तोफर हेन्री मॉरिसच्या नावावर आहे. ख्रिस मॉरिसनं 4 सामन्यात एकूण 7 विकेट घेतल्या आहेत.
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 10 डिसेंबर, डरबन (दक्षिण आफ्रिका 11 धावांनी विजयी)
- दुसरा T20 सामना : आज, सेंच्युरीयन
- तिसरा T20 सामना : 14 डिसेंबर, जोहान्सबर्ग
South Africa win the first T20I by 11 runs.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 10, 2024
We look to bounce back in the next match on Friday 🏏#SAvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/YTe8sVjLQo
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पहिला T20 कधी होणार?
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला T20 सामना मंगळवार, 10 डिसेंबर रोजी किंग्समीड, डरबन इथं भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा पहिला T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20 मालिका भारतातील टीव्हीवर स्पोर्ट्स 18-1 एसडी आणि स्पोर्ट्स 18-1 एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. तसंच जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
मालिकेसाठी दोन्ही संघ :
दक्षिण आफ्रिका : हेनरिक क्लासेन (कर्णधार/यष्टीरक्षक), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके (विकेटकीपर), डोनोव्हन फरेरा (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, पॅट्रिक क्रुगर, जॉर्ज लिंडे, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्टजे, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), तबरेझ शम्सी, अँडिले सिमेलेन, रासी व्हॅन डर ड्युसेन
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार/यष्टीरक्षक), अबरार अहमद, बाबर आझम, हारिस रौफ, जहाँदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकीम, तय्यब ताहिर, उस्मान खान (यष्टीरक्षक)
हेही वाचा :