डरबन SA Beat PAK by 11 Runs : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघानं पाकिस्तानविरुद्धचा पहिला T20 सामना 11 धावांनी जिंकला आणि यासह 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पण, दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा हिरो कोण होता हे तुम्हाला माहीत आहे का? तरुणांचा खेळ म्हटल्या जाणाऱ्या या फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विजयात एका 33 वर्षीय खेळाडूचं योगदान होतं. जो डर्बनच्या मैदानावर इतर खेळाडूंसोबत टीम बसमध्ये नाही तर पोलिस व्हॅनमध्ये आला होता. आम्ही बोलत आहोत जॉर्ज लिंडे बद्दल, ज्यानं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला पहिला T20 जिंकण्यात मदत केली.
South Africa win the first T20I by 11 runs.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 10, 2024
We look to bounce back in the next match on Friday 🏏#SAvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/YTe8sVjLQo
डेव्हिड मिलर आणि जॉर्ज लिंडे यांची स्फोटक फलंदाजी :
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 183 धावा केल्या. 30 धावांत 3 गडी बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 180 पेक्षा जास्त धावसंख्या गाठता आली, कारण डेव्हिड मिलर आणि जॉर्ज लिंडे यांनी एकत्रितपणे शानदार फलंदाजी केली होती. मिलरनं 40 चेंडूत 8 षटकारांसह 82 धावा केल्या, ज्यात त्याचा स्ट्राइक रेट 205 होता. त्याचप्रमाणे जॉर्ज लिंडेनंही 200 च्या स्ट्राईक रेटनं केवळ 24 चेंडूत 48 धावा केल्या. त्यानं 4 षटकार मारले.
Pakistan captain @iMRizwanPak brings up his 30th T20I fifty #SAvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/0f9EYP20PE
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 10, 2024
लिंडेची फलंदाजीनंतर गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी :
डेव्हिड मिलरनं त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 8 वं अर्धशतक झळकावलं. तर जॉर्ज लिंडेनंही आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीमध्येही त्यानं कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानचं जॉर्ज लिंडेनं 4 षटकांच्या स्पेलमध्ये 21 धावा देऊन 4 बळी घेत कंबरडं मोडलं. ही क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
🟢🟡Match Result
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 10, 2024
What a start to the Series!😮💨
🇿🇦South Africa win by 11 runs down in Durban.
The Proteas take a 1-0 lead in the 3-Match KFC T20i Series, as they head up to Pretoria next.🏟️😁🏏#WozaNawe#BePartOfIt #SAVPAK pic.twitter.com/uqQlJwZsMT
मॅन ऑफ द मॅच झाल्यावर लिंडेनं सांगितली आपबिती :
फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जॉर्ज लिंडेला सामनावीर म्हणून निवडण्यात आलं. सामन्याचा हिरो बनल्यानंतर लिंडेनं सांगितले की, या कामगिरीद्वारे T20 इंटरनॅशनलमध्ये त्याचं स्वप्नवत पुनरागमन झालं आहे. त्यानं स्वतःला दिलेलं वचन त्यानं पूर्ण केलं याचा त्याला आनंद आहे. दरम्यान, जॉर्ज लिंडेनं सांगितलं की त्यांची मैदानावर येताना बस चुकली होती, त्यानंतर पोलिसांनी त्याला सोडलं.
Sensational Stuff!👏
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 10, 2024
George Linde narrowly misses out on a 5’ver, but finishes with career-best T20i bowling figures in a stand-out allrounder performance with both bat and ball!🏏😃🇿🇦
Brilliant work George!#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/GxFLG8bAw4
हेही वाचा :