मुंबई : Sarfaraz Khan in Team India : भारत आणि इंग्लंड कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरु होत असून, त्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. के. एल. राहुल आणि रवींद्र जडेजा हे दोन अनुभवी खेळाडू या सामन्यात खेळू शकणार नाहीत. रविवारी पहिल्या कसोटीत जडेजाच्या पायाला दुखापत झाली होती. तर, राहुलने उजव्या मांडीत दुखत असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर बीसीसीआयने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये रवींद्र जडेजा आणि के.एल. राहुल 2 फेब्रुवारी 2024 पासून विशाखापट्टणम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीत. तसंच, त्यांच्यावर बीसीसीआयचं वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे असंही स्पष्ट केलं आहे.
-
The Men's Selection Committee have added Sarfaraz Khan, Sourabh Kumar and Washington Sundar to India's squad.#INDvENG https://t.co/xgxI8NsxpV
— BCCI (@BCCI) January 29, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Men's Selection Committee have added Sarfaraz Khan, Sourabh Kumar and Washington Sundar to India's squad.#INDvENG https://t.co/xgxI8NsxpV
— BCCI (@BCCI) January 29, 2024The Men's Selection Committee have added Sarfaraz Khan, Sourabh Kumar and Washington Sundar to India's squad.#INDvENG https://t.co/xgxI8NsxpV
— BCCI (@BCCI) January 29, 2024
दोन्ही खेळाडू पदार्पण करू शकतात : सरफराज खानच्या निवडीवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याच्या निवडीनंतर तो दुसऱ्या कसोटीत पदार्पण करू शकतो हे निश्चित झालं आहे. कारण के. एल. राहुल आता संघाबाहेर आहे. त्याच्या जागी प्लेइंग 11 मध्ये सरफराजचा समावेश केलाय. मात्र, रजत पाटीदारही आहे. आता या दोघांपैकी एकाला संधी मिळते की दोन्ही खेळाडू पदार्पण करू शकतात हे पाहाणं महत्वाचं असणार आहे. तसंच, खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या शुभमन गिलला विश्रांती दिल्यास त्याच्या जागी पाटीदार आणि के.एल. राहुलच्या जागी सरफराज खेळू शकतो. अशा प्रकारे दोघांना पदार्पणाची संधी मिळू शकते.
सरफराजला पाटीदारकडून स्पर्धा होऊ शकते : सध्या संघात विराट कोहली, के. एल. राहुल आणि जडेजासारखे खेळाडू नाहीत. तसंच, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर देखील फॉर्मात नाहीत. अशा स्थितीत सरफराजला संधी मिळण्याची दाट आशा आहे, जेणेकरून मधली फळी मजबूत होऊ शकेल. तसंच, 26 वर्षीय सरफराज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच भारत-अ संघाकडून खेळताना त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध 161, 55 आणि 96 धावांची खेळी खेळली होती. मात्र, सरफराजला रजत पाटीदारकडून स्पर्धेला सामोरे जावं लागू शकतं. पाटीदारने अलीकडेच भारत-अ संघाकडून खेळताना इंग्लंड लायन्सविरुद्ध 151 आणि 111 धावांची खेळीही खेळली आहे.
हेही वाचा :
1 पुण्याच्या अभिजित कुंटेंना जागतिक बुद्धीबळातील मानाचा 'वख्तांग कार्सेलाडझे' पुरस्कार जाहीर
2 दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, जडेजानंतर केएल राहुलही दुखापतीमुळे बाहेर
3 दक्षिण आफ्रिका टी 20 लीगमध्ये हेनरिकनं दाखवला 'क्लास'; अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावत रचला इतिहास