बेंगळुरु Sarfaraz Khan Maiden Century : आपत्तीत संधी शोधणं कशाला म्हणतात तर हे सर्फराज खानकडून शिकावं. न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरु इथं सुरु असेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघावर डावाच्या पराभवाची भीती असताना सर्फराज खाननं कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळून सर्वांची मनं जिंकली. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी सर्फराज खाननं आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. तिसऱ्या दिवशीच्या 70 धावांच्या पुढं खेळताना सर्फराजनं चौकारासह शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे याच सामन्याच्या पहिल्या डावात सर्फराज खान शून्यावर आउट झाला होता, आणि आता भारताच्या दुसऱ्या डावात त्यानं शतक ठोकलं, पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात शतक करणारा सर्फराड खान भारताचा 22वा खेळाडू ठरलाय.
Maiden Test 💯! 👏 👏
— BCCI (@BCCI) October 19, 2024
What a cracker of a knock this is from Sarfaraz Khan! ⚡️⚡️
Live ▶️ https://t.co/8qhNBrrtDF#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UTFlUCJOuZ
यावर्षी झालं कसोटी पदार्पण : देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्यानंतर सर्फराज बराच वेळ संधी येण्याची वाट पाहत राहिला. पण त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकलं नाही. यामुळं नाउमेद होण्याऐवजी तो स्वतःवर काम करत राहिला. शतकामागून शतकं झळकावत राहिला. अखेर 15 फेब्रुवारीला राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. 62 धावा केल्यानंतर तो शतकाकडं वेगानं वाटचाल करत होता, मात्र रवींद्र जडेजाच्या चुकीमुळं तो धावबाद झाला.
शतकानंतरचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं : सर्फराज खानचं पदार्पणाच्या कसोटीत शतक हुकलं असलं तरी यावेळी त्यानं टीम साऊथीला शानदार पंच देऊन तो पराक्रम पूर्ण केला. या शतकाचा आनंद सर्फराजच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ज्या पद्धतीनं मैदानावर धावून त्यानं हा क्षण साजरा केला तो खास होता.
MAIDEN TEST CENTURY BY SARFARAZ KHAN...!!! 🌟
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2024
- India were behind by a mountain, Sarfaraz stood up and took the responsibility, what a blistering innings in the context of the game. The Sarfaraz show has kicked off in international cricket! 🙇♂️🔥 pic.twitter.com/09ji04vz2B
भारताचा जबरदस्त पलटवार : न्यूझीलंडनं आपल्या भूमीवर सर्वात कमी धावसंख्येवर (46) रोखून भारतीय संघाला मोठा धक्का दिला होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात त्याची भरपाई करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, न्यूझीलंडला मोठी आघाडी मिळवण्यापासून रोखता आली नाही. भारताच्या पहिल्या डावाला प्रत्युत्तर देताना पाहुण्या संघानं रचिन रवींद्रचं शतक आणि टीम साऊदीच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात 402 धावांची मोठी धावसंख्या उभारली. किवी संघाला 356 धावांची मोठी आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज आपल्या नैसर्गिक फॉर्ममध्ये परतताना दिसले. सध्या भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा 12 धावांनी मागे आहेत.
हेही वाचा :