जयपूर : RR vs LSG Live Score IPL 2024 : राजस्थान रॉयल्स (RR) नं IPL 2024 मध्ये विजयी सुरुवात केली आहे. RR नं त्यांच्या पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) चा 20 धावांनी पराभव केला. कर्णधार संजू सॅमसन (नाबाद 82) आणि रियान पराग (43) यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर राजस्थाननं 193/4 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ संघाला निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून केवळ 173 धावा करता आल्या. लखनौकडून निकोलस पुरननं सर्वाधिक 64 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार केएल राहुलनं (58) अर्धशतक झळकावलं. क्विंटन डी कॉक (4) आणि मार्कस स्टॉइनिस (3) मोठी फलंदाजी करू शकले नाहीत. देवदत्त पडिक्कल खातं उघडू शकला नाही.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग-11 : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, आवेश खान आणि युझवेंद्र चहल.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग-11 : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, नवीन उल हक आणि यश ठाकूर.
IPL 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक :
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता
- गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वा
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज, 25 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वा.
- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वा.
- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वा
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, संध्याकाळी 7.30 वा.
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 29 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30
- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, 30 मार्च, लखनौ, संध्याकाळी 7.30 वा.
- गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, 3.30 PM
- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 31 मार्च, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
- मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वा.
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30
- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 3 एप्रिल, विझाग, संध्याकाळी 7.30
- गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30
- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30
- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30