नवी दिल्ली Rohit Sharma Records : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत दुसऱ्यांदा टी 20 विश्वचषकाचा चॅम्पियन बनला आहे. भारतीय संघानं टी 20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करुन विश्वचषकाचा मुकूट पटकावला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माला केवळ 9 धावांचं योगदान देता आलं. परंतु, असं असतानाही त्यानं अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत.
What A Moment & What A Win to reach The Landmark! 🔝 🙌
— BCCI (@BCCI) June 29, 2024
Captain Rohit Sharma! 🫡 🫡 #T20IWorldCup | #TeamIndia | #SAvIND | @ImRo45 pic.twitter.com/i3hLTuXZpt
रोहित शर्माच्या नावावर विशेष रेकॉर्ड नोंदवले गेले :
- रोहित शर्मा टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात 2 टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग असणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यासह रोहित दोन वेळा टी20 विश्वचषक चॅम्पियन बनला आहे. रोहित शर्मा 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वविजेत्या संघाचा भाग होता. आता त्यानं त्याच्या नेतृत्वाखाली 2024 चा टी20 विश्वचषक जिंकला आहे.
- रोहित शर्मा सर्वाधिक टी20 सामने जिंकणारा पहिला कर्णधार ठरला आहे. रोहितनं कर्णधार म्हणून 50 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. त्याच्यानंतर पाकिस्तानचा बाबर आझम 48 सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
- रोहित शर्मा हा टी20 विश्वचषक जिंकणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. त्यानं वयाच्या 37 वर्षे 60 दिवसात टी20 विश्वचषक 2024 चं विजेतेपद पटकावलं आहे.
- रोहित शर्मा विराट कोहलीसह भारतासाठी सर्वाधिक आयसीसी फायनल खेळणारा संयुक्तपणे पहिला खेळाडू ठरला आहे. या दोघांनी एकूण 8-8 टी20 विश्वचषक खेळले असून, 7 आयसीसी फायनल खेळणाऱ्या युवराज सिंगला मागं टाकलं आहे.
- सर्वाधिक टी20 फायनल खेळणारा रोहित हा पाचवा खेळाडू ठरला आहे. सर्वाधिक टी20 फायनल खेळणारा खेळाडू म्हणजे वेस्ट इंडिजचा डेव्हन ब्राव्हो, त्यानं एकूण 17 टी20 फायनलचे सामने खेळले आहेत.
- टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात जास्त सामनावीर पुरस्कार जिंकणारा रोहित तिसरा खेळाडू ठरला आहे. त्यानं 14 टी 20 सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. त्याच्या आधी विराट कोहली (16) आणि सूर्यकुमार यादव (14) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर कायम आहेत.
हेही वाचा :