ETV Bharat / sports

भारत-बांगलादेश पहिला T20 रद्द होणार? ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय - IND vs BAN 1st T20I

IND vs BAN 1st T20I Gwalior : ग्वाल्हेर इथं 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील T20 सामन्यापूर्वी, जिल्हा प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे.

IND vs BAN 1st T20I Gwalior
IND vs BAN 1st T20I Gwalior (AFP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 4, 2024, 3:24 PM IST

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) IND vs BAN 1st T20I Gwalior : ग्वाल्हेर इथं 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील T20 सामन्यापूर्वी, जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हे आदेश 7 ऑक्टोबरपर्यंत लागू राहतील. हिंदू महासभेनं 6 ऑक्टोबरला दिलेली ग्वाल्हेर बंदची हाक आणि इतर संघटनांनी केलेला विरोध पाहता प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

हिंदू महासभेचा विरोध : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू महासभेनं हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. बांगलादेशमध्ये ऑगस्टमध्ये हिंसाचार, राजकीय गोंधळ आणि सरकार बदलल्यानंतर ही संघटना निषेध करत आहे. बुधवारी संघटनेनं ग्वाल्हेरमध्ये या संदर्भात निदर्शनं करत सामना रद्द करण्याचीही मागणी केली.

कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश : ग्वाल्हेरचे जिल्हा दंडाधिकारी रुचिका चौहान यांनी पोलीस अधीक्षक (SP) यांच्या शिफारशीवरुन भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. ब्रिटिशकालीन फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) बदलून हे कलम अलीकडं लागू करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक म्हणाले की, विविध संघटना आंदोलनं, मिरवणुका, पुतळे जाळणे यासारख्या कामांमध्ये गुंतलेल्या असतात, त्यामुळं जिल्ह्यातील शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.

सोशल मीडियावरही निरीक्षण : सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना भडकावणारे संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा अन्य साहित्य प्रसारित करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे. तसंच या कालावधीत सार्वजनिक आणि खाजगी ठिकाणी आंदोलनं आणि पुतळे जाळण्यास परवानगी दिली जाणार नाही.

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात : भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा आंतरराष्ट्रीय सामना 14 वर्षांनंतर माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. सामन्यादरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी सुमारे 1,600 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. ग्वाल्हेर इथं भारत आणि बांगलादेश यांच्यातील या रोमांचक T20 सामन्यादरम्यान शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. सामना सुरळीत पार पडावा यासाठी कोणत्याही प्रकारचा तणाव आणि वाद टाळणे हा या निर्बंधांचा उद्देश आहे.

हेही वाचा :

  1. T20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना; 'इथं' पाहा 'फ्री'मध्ये लाईव्ह - INDW vs NZW T20I LIVE IN INDIA

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.