कॅनबेरा PM Doing Commentary in Match : भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय संघ तिथं 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत सहभागी होणार आहे. पर्थमध्ये खेळला गेलेला पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यानंतर मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणार आहे. त्याआधी भारतीय संघाचा कॅनबेरा इथं पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध सराव सामना होत आहे. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय सराव सामन्यासह भारतीय संघ पिंक बॉल टेस्टची तयारी करेल.
Australian Prime Minister in the commentary box. 😄 pic.twitter.com/nMkA9pEifY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 30, 2024
पंतप्रधान पोहोचले कॉमेंट्री बॉक्समध्ये : कॅनबेरा येथील सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसानं व्यत्यय आणला. त्यामुळं नाणेफेक वेळेवर होऊ शकली नाही. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ड्रेसिंग रुममध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळालं. पीएम अल्बानीज थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचले आणि कॉमेंट्री टीमसोबत काही वेळ घालवला. ते क्रिकेट कॉमेंट्री करतानाही दिसले. इतकंच नव्हे तर सामन्याच्या समालोचकांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरंही दिली.
हेझलवूडच्या जागी कोण खेळणार? : यादरम्यान, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जोश हेझलवूडच्या जागी वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडचा संघात समावेश करण्याबाबत पंतप्रधान बोलले. शनिवारी, हेझलवूड साइड स्ट्रेनच्या दुखापतीमुळं ॲडलेड ओव्हल सामन्यासाठी संघाबाहेर होता. त्यामुळं गोलंदाजीत एक जागा रिक्त झाली आहे. बोलंड आधीच संघात आहे. पर्थ इथं झालेल्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकला नाही. बोलंडची उपस्थिती असूनही ऑस्ट्रेलियानं दोन वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश केला आहे. शॉन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट यांना स्थान देण्यात आले आहे.
The Prime Minister's XI and India will play a 50-over match tomorrow after day one in Canberra was abandoned due to rain #PMXIvIND
— cricket.com.au (@cricketcomau) November 30, 2024
Updated session times 👇https://t.co/16LTFWpDvt
बोलंडची केली स्तुती : प्लेइंग-11 मध्ये हेजलवूडच्या बदलीबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याआधीही, ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी निवडकर्त्यांना फक्त त्यांनाच निवडण्यास सांगितलं आहे, जे प्रभावी आहेत. "स्कॉट बोलँड, मला वाटते की तो खेळण्यास पात्र आहे," असं ते म्हणाले. तसंच "त्यानं आम्हाला कधीही निराश केले नाही. अर्थात, त्यानं खूप उशीरा सुरुवात केली, परंतु मला वाटतं की जर तुम्ही हेझलवुडसारखाच एखादा खेळाडू शोधत असाल, जो तुम्हाला कधीही निराश करु देत नाही. जोश हेझलवूड नक्कीच एक असामान्य गोलंदाज आहे." असं पंतप्रधान म्हणाले.
स्कॉट बोलँड दुर्दैवी : पुढं बोलताना अल्बानीज म्हणाले, "स्कॉट बोलँड थोडा दुर्दैवी आहे की तो पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि हेझलवूडच्या वेळी संघात आहे. पीएम इलेव्हनच्या निवडीतच मला भूमिका मिळते. ते नक्कीच ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांवर अवलंबून असेल. जर ते माझ्यावर अवलंबून असेल तर ही माझी सूचना आहे. व्यापक अर्थानं माझा काही प्रभाव पडतो का ते आम्ही पाहू." पहिल्या कसोटीत भारताकडून 295 धावांनी पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी पुढं काय तर यावर पंतप्रधानांना विश्वास आहे की त्यांचा संघ परत येईल. "ऑस्ट्रेलिया, त्यांना कधीही कमी लेखू नका," ते म्हणाले मला वाटते की ते ॲडलेडमध्ये जोरदार पुनरागमन करतील. या दोन्ही संघांमध्ये जोरदार टक्कर झाली आहे.
हेही वाचा :