ETV Bharat / sports

नरेंद्र मोदी स्टेडियमपेक्षा 10 पटीनं महागडं आहे पर्थचं ऑप्टस स्टेडियम, किती आहे किंमत? - EXPENSIVE CRICKET STADIUM IN WORLD

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर सुरु आहे. हे क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात महागडे क्रिकेट स्टेडियम आहे.

Most Expensive Cricket Stadium
जगातील सर्वात महागडे क्रिकेट स्टेडियम (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 22, 2024, 11:24 AM IST

पर्थ Most Expensive Cricket Stadium : अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर बांधलेलं नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. 2020 साली बांधलेल्या या स्टेडियममध्ये 100,000 चाहते एकत्र बसून सामना पाहू शकतात. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. पण पर्थचं ऑप्टस स्टेडियम किमतीच्या बाबतीत नरेंद्र मोदी स्टेडियमपेक्षा 10 पट महाग आहे. या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना सुरु आहे. हे क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात महागडं क्रिकेट स्टेडियम देखील आहे.

जगातील सर्वात महागडं क्रिकेट स्टेडियम : पर्थचं ऑप्टस स्टेडियम हे ऑस्ट्रेलियातील सर्वात सुंदर स्टेडियमपैकी एक आहे, जे देशातील सर्वात मोठं आणि नवीन स्टेडियम देखील आहे. 2014 साली सुरु झालेलं हे स्टेडियम तयार करण्यासाठी सुमारे 3 वर्षे लागली. स्टेडियम 2017 च्या उत्तरार्धात पूर्ण झालं आणि 21 जानेवारी 2018 रोजी अधिकृतपणे उघडण्यात आलं. हे ऑस्ट्रेलियातील तिसरं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम देखील आहे, ज्यात 60,000 लोक एकाच वेळी सामना पाहू शकतात. हे मैदान 165 मीटर लांब आणि 130 मीटर रुंद आहे.

मैदानासाठी किती आला खर्च : मीडिया रिपोर्ट्सनुसार, पर्थचं ऑप्टस स्टेडियम तयार करण्यासाठी सुमारे 1.6 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्स खर्च झाले होते, जे त्यावेळी अंदाजे 8 हजार कोटी रुपये होते. पर्थ स्टेडियमचा वापर प्रामुख्यानं फुटबॉल आणि क्रिकेटसाठी केला जातो. फुटबॉल, रग्बी आणि ॲथलेटिक्सचे सामने इथं अनेकदा होतात. पर्थचे दोन ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीग संघ इथं आपले सामने खेळतात. त्याच वेळी, बिग बॅश लीगमधील संघ पर्थ स्कॉर्चर्स देखील त्याच ठिकाणी घरचे खेळ खेळतो.

नरेंद्र मोदी स्टेडियम बांधण्यासाठी किती खर्च झाला? : भारतातील नरेंद्र मोदी स्टेडियम 63 एकरमध्ये पसरलं आहे. या स्टेडियममध्ये अंदाजे 114,000 लोक बसण्याची क्षमता आहे. या मैदानात 11 वेगवेगळ्या क्रिकेट खेळपट्ट्याही आहेत. विशेष बाब म्हणजे या स्टेडियममध्ये बसून चाहत्यांना क्रिकेटचा प्रत्येक कोन चांगल्या प्रकारे पाहता येईल. स्टँडला मध्यभागी एकच खांब आहे, ज्यामुळं तो बाकीच्या मैदानांपेक्षा वेगळा आहे. हे स्टेडियम तयार करण्यासाठी सुमारे 5 वर्षे लागली आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार 800 कोटी रुपये खर्च झाले. त्याच वेळी, इथं पहिला सामना भारत आणि इंग्लंड संघांमध्ये 24 फेब्रुवारी 2021 रोजी खेळला गेला, जो दिवस-रात्र कसोटी सामना होता.

हेही वाचा :

  1. पती मैदानावर खेळणार, पत्नी कॉमेंट्री करणार; बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या पहिल्या सामन्यात अनोखा क्षण
  2. 15 वर्षांनंतर बांगलादेश करेबियन संघाविरुद्ध सामना जिंकणार की वेस्ट इंडिज वर्चस्व राखणार? रोमांचक सामना 'इथं' पाहा लाईव्ह
  3. बुमराह-कमिन्स पर्थमध्ये नाणेफेकीला येताच घडणार इतिहास; 147 वर्षाच्या क्रिकेट इतिहासात 'असं' फक्त पाचवेळा घडलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.