पॅरिस Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करणं सुरुच ठेवलं आहे. भारतीय ॲथलीट प्रवीण कुमार (T44) यानं पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक पटकावलं आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचं हे सहावं सुवर्णपदक ठरलं. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतानं प्रथमच सहा सुवर्णपदकं जिंकली आहेत. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतानं 5 सुवर्णपदकं जिंकली होती.
2024 Paris Paralympics | Tokyo Silver medallist Praveen Kumar wins Gold medal with his personal best jump of 2.08m in Men's High Jump -T64 final event pic.twitter.com/KohrL6w4iM
— ANI (@ANI) September 6, 2024
पदकांची संख्या 26 : प्रवीण कुमारच्या सुवर्णपदकासह पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताच्या पदकांची संख्या आता 26 झाली आहे. भारतानं आतापर्यंत 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 12 कांस्यपदकं जिंकली आहेत. भारत 26 पदकांसह पदकतालिकेत 14 व्या क्रमांकावर आहे.
सर्वोत्तम उडीसह जिंकलं सुवर्णपदक : 21 वर्षीय प्रवीणनं 2.08 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत अमेरिकेच्या डेरेक लॉकडेंटनं रौप्यपदक तर उझबेकिस्तानच्या टेमुरबेक गियाझोव्हनं कांस्यपदक पटकावलं. डेरेकचा सर्वोत्तम 2.06 मीटर होता. टेमुरबेकनं 2.03 मीटरची सर्वोत्तम उडी मारुन कांस्यपदक जिंकलं. लहान पायांनी जन्मलेला प्रवीण नोएडाचा रहिवासी आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते :
- अवनी लेखरा (नेमबाजी) : सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
- मोना अग्रवाल (नेमबाजी) : कांस्यपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
- प्रीती पाल (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
- मनीष नरवाल (नेमबाजी) : रौप्यपदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
- रुबिना फ्रान्सिस (शूटिंग) : कांस्यपदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
- प्रीती पाल (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
- निषाद कुमार (ॲथलेटिक्स) : रौप्यपदक, पुरुष उंच उडी (T47)
- योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) : रौप्यपदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)
- नितेश कुमार (बॅडमिंटन) : सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)
- मनीषा रामदास (बॅडमिंटन) : कांस्यपदक, महिला एकेरी (SU5)
- तुलसीमाथी मुरुगेसन (बॅडमिंटन) : रौप्यपदक, महिला एकेरी (SU5)
- सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) : रौप्यपदक, पुरुष एकेरी (SL4)
- शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) : कांस्यपदक, मिश्र कंपाउंड ओपन
- सुमित अँटील (ॲथलेटिक्स) : सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F64 श्रेणी)
- नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) : कांस्यपदक, महिला एकेरी (SH6)
- दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, महिला 400 मीटर (T20)
- मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, पुरुष उंच उडी (T63)
- शरद कुमार (ॲथलेटिक्स) : रौप्यपदक, पुरुष उंच उडी (T63)
- अजित सिंग (ॲथलेटिक्स) : रौप्यपदक, पुरुष भालाफेक (F46)
- सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) : कांस्यपदक, पुरुष भालाफेक (F46)
- सचिन सर्जेराव खिलारी (ॲथलेटिक्स) : रौप्यपदक, पुरुष शॉटपुट (F46)
- हरविंदर सिंग (तिरंदाजी) : सुवर्णपदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन
- धरमबीर (ॲथलेटिक्स) : सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो (F51)
- प्रणव सुरमा (ॲथलेटिक्स) : रौप्यपदक, पुरुष क्लब थ्रो (F51)
- कपिल परमार (जुडो) : कांस्यपदक, पुरुष 60 किलो (जे1)
- प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स) : सुवर्णपदक, पुरुष उंच उडी (T44)
हेही वाचा :