पॅरिस 2 August India Olympic Schedule : पॅरिस ऑलिम्पिकला सहा दिवस उलटले असून, भारतानं आतापर्यंत केवळ तीन पदकं जिंकली असून ही सर्व पदकं नेमबाजीत आली आहेत. स्पर्धेचा सहावा दिवस भारतीय संघासाठी खूप चांगला होता. कारण स्वप्नील कुसाळेनं पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. तथापि, निकत जरीन आणि प्रवीण जाधव स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळं काहीसे निराशाजनक निकालंही लागले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकचा आज सातवा दिवस आहे.
पी.व्ही.सिंधूचं आव्हान संपुष्टात : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूचं आव्हान संपुष्टात आलं आहे. रिओ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेली पी.व्ही. सिंधू या ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्रिक करण्यासाठी उतरली होती. पण उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये पी.व्ही.सिंधूला पराभवाचा धक्का बसला. चीनच्या ही बिंग जियाओने सिंधूवर 21-19, 21-14 अशी मात केली.
गोल्फ : जागतिक क्रमवारीत 173 व्या क्रमांकावर असलेला गोल्फर शुभंकर आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा वेग कायम राखण्याच्या उद्देशानं यंदा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानं या वर्षी 17 स्पर्धा खेळल्या आहेत. त्यापैकी 14 मध्ये तो यशस्वी झाला आहे. याचा अर्थ फक्त तीन स्पर्धा होत्या ज्यात तो दोन फेऱ्यांच्या पुढं जाऊ शकला नाही.
- पुरुषांची वैयक्तिक स्टोक प्ले फेरी 2 (शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर) - दुपारी 12:30 वाजता
नेमबाजी : मनू भाकरनं आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदकं जिंकून तिनं रचला आहे. स्पर्धेत तिसरं पदक मिळवण्याचा ती प्रयत्न करेल, पण चांगली कामगिरी तिच्या पदकाचा रंगही बदलू शकते. स्कीट स्पर्धेत 10व्या क्रमांकावर असलेल्या नारुकाला ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय नेमबाजी संघाच्या चमकदार कामगिरीमध्ये आणखी एका पदकाची भर घालायची आहे.
- 25 मीटर पिस्तूल महिला पात्रता प्रिसिजन - (ईशा सिंग आणि मनू भाकर) - दुपारी 12:30 वाजता
- स्कीट पुरुष पात्रता दिवस 1 (अनंत नारुका) - दुपारी 1:00 वाजता
तिरंदाजी : पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजांची आतापर्यंत निराशाजनक कामगिरी झाली आहे आणि भारतीय मिश्र संघ इंडोनेशियाविरुद्ध लढेल तेव्हा तिरंदाजीमध्ये पदक जिंकण्याची ही शेवटची संधी असेल.
- तिरंदाजी मिश्र सांघिक स्पर्धा ⅛ एलिमिनेशन फेरी - (भारत) - दुपारी 1:19 वाजता
ज्युडो : तुलिका मान पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिचा पहिला सामना खेळणार आहे आणि ज्युडोका क्यूबन इडालिस ऑर्टिजशी तिचा सामना असेल. विशेष म्हणजे तुलिकानं ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवून इतिहास रचला होता आणि ज्युदोमध्ये अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली होती.
- महिला +78 किलो एलिमिनेशन राउंड ऑफ 32 - (तुलिका मान) - दुपारी 1:30 वाजता
नौकानयन :
- महिलांची डिंगी - (नेत्रा कुमारन) - दुपारी 3:45 वाजता
- पुरुषांची डिंगी - (विष्णू सरवणन) - संध्याकाळी 7:05 वाजता
ऍथलेटिक्स :
- महिला 5000 मीटर फेरी 1 - (अंकिता, पारुल चौधरी) - रात्री 9:40 वाजता
- पुरुषांची शॉट पुट पात्रता - (तजिंदरपाल सिंग तूर) - रात्री 11:40 वाजता
हॉकी : हॉकीमध्ये भारताला ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागणार असून ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करणं हे मोठं आव्हान असेल.
- पुरुषांचा पूल ब सामना - (भारत) - दुपारी 04:45 वाजता
हेही वाचा :