ETV Bharat / sports

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज तिसऱ्या दिवशीही नेमबाजीत भारताला मिळणार पदक? - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

29 July India Olympic Schedule : भारतीय महिला नेमबाज मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. आता तिसऱ्या दिवशी भारताचे कोणते खेळाडू कोणाविरुद्ध आणि कधी खेळणार आहेत. याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत.

29 July India Olympic Schedule
पॅरिस ऑलिम्पिक (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jul 29, 2024, 6:00 AM IST

पॅरिस 29 July India Olympic Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा दुसरा दिवस भारतासाठी धमाकेदार ठरला आणि भारतीय महिला नेमबाज मनू भाकरनं कांस्यपदक जिंकलं. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलंच पदक होतं. आज आम्ही तुम्हाला भारताच्या तिसऱ्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक सांगणार आहोत. तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू नेमबाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि तिरंदाजीमध्ये देशासाठी चमकदार कामगिरी करताना दिसतील.

28 जुलै रोजी भारतीय खेळाडूंचे कोणते सामने :

बॅडमिंटन : भारतीय खेळाडू तिसऱ्या दिवसाची सुरुवात बॅडमिंटननं करताना दिसतील. पहिला सामना पुरुष दुहेरीचा असेल, जिथं सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जर्मनीच्या लॅम्सफस मार्क आणि सीडेल मार्विन यांच्यासोबत खेळताना दिसतील. क्रास्टो तनिषा आणि अश्विन पोनप्पा महिला दुहेरीत भारताकडून खेळताना दिसणार आहेत. तिचा सामना जपानच्या मात्सुयामा नामी आणि चिहारुसोबत खेळताना दिसणार आहे. बॅडमिंटनमधील पुरुष एकेरीच्या सामन्यात लक्ष्य सेन भारताकडून खेळताना दिसणार आहे. ग्रुप स्टेजच्या सामन्यात तो बेल्जियमच्या कारागी ज्युलियनसोबत खेळताना दिसणार आहे.

  • पुरुष दुहेरी : (ग्रुप स्टेज) : सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, दुपारी 12 वाजता
  • महिला दुहेरी (ग्रुप स्टेज) : क्रॅस्टो तनिषा आणि अश्विन पोनप्पा, दुपारी 12:50 वाजता
  • बॅडमिंटन पुरुष एकेरी गट स्टेज सामना (लक्ष्य सेन), संध्याकाळी 6:30 वाजता

नेमबाजी : 29 जुलै हे भारतासाठी पूर्णपणे नेमबाजीनं व्यस्त असणार आहे. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रता स्पर्धेत भारतासाठी एकेरीत कांस्यपदक जिंकणारी मनू भाकर आणि सरबज्योत सिंग टीम 1 मध्ये खेळताना दिसणार आहेत. तर रिदम सांगवान आणि अर्जुन चीमा टीम 2 कडून खेळताना दिसणार आहेत. पुरुषांच्या ट्रॅप पात्रतेमध्ये भारतासाठी पृथ्वीराज तोंडाईमन दिसणार आहे. रमिता जिंदाल 10 मीटर एअर रायफल महिलांच्या अंतिम फेरीत आणि अर्जुन बबुता 10 मीटर एअर रायफल पुरुषांच्या अंतिम फेरीत दिसणार आहेत.

  • 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रता (मनु भाकर आणि सरबज्योत सिंग - सांघिक 1) (रिदम सांगवान आणि अर्जुन चीमा - सांघिक 2), दुपारी 12:45 वाजता
  • पुरुष ट्रॅप पात्रता (पृथ्वीराज तोंडाईमन), दुपारी 1 वाजता
  • 10 मीटर एअर रायफल महिला अंतिम (रमिता जिंदाल), दुपारी 1 वाजता
  • 10 मीटर एअर रायफल पुरुषांची अंतिम फेरी (अर्जुन बबुता), दुपारी 3:30 वाजता

हॉकी : भारतीय पुरुष हॉकी संघ ब गटातील आपला दुसरा सामना अर्जेंटिनासोबत खेळताना दिसणार आहे. गेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला होता.

  • हॉकी पुरुष गट - ब (भारत विरुद्ध अर्जेंटिना), दुपारी 4:16 वाजता

तिरंदाजी : भारतासाठी पुरुष संघ तिरंदाजीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत खेळताना दिसणार आहे. भारतीय संघात बोम्मदेवरा धीरज, जाधव प्रवीण रमेश आणि आरएआय तरुणदीपसारखे स्टार तिरंदाज आहेत.

  • तिरंदाजी पुरुष सांघिक उपांत्यपूर्व फेरी (बोम्मादेवरा धीरज, जाधव प्रवीण रमेश आणि आरएआय तरुणदीप), संध्याकाळी 7:31 वाजता

टेबल टेनिस : श्रीजा अकुला भारतासाठी टेबल टेनिसमध्ये दिसणार आहे. महिला एकेरीच्या 32व्या फेरीत ती दिसणार आहे.

  • महिला एकेरी फेरी 32 (श्रीजा अकुला), रात्री 11:30 वाजता

हेही वाचा :

  1. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालं पहिलं पदक; अचूक 'निशाणा' साधत मनू भाकरनं रचला इतिहास - Paris Olympics 2024
  2. रमिता जिंदालचा अचूक 'निशाणा'; 10 मीटर एअर रायफल महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश, नेमबाजीत देशाला मिळणार दुसरं पदक? - Paris Olympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.