पॅरिस Paris Olympics 2024 Shooting : भारताचा अव्वल नेमबाज अर्जुन बबुता पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत चौथ्या स्थानी राहिला. पहिल्या सिरीजनंतर तो दुसऱ्या स्थानी होता. मात्र त्याला कामगिरीत सातत्या राखता आलं नाही.
शेवटच्या शॉटनं हुकलं पदक : अर्जुन 208.4 गुणांसह चौथा राहिला. अर्जुननं एकंदरीत चांगली कामगिरी केली असली तरी, एकेवेळ अर्जुन पदक जिंकण्याच्या स्थितीत होता. पण त्याचा शेवटचा नेम अचूक नव्हता. अर्जुनला शेवटच्या शॉटमध्ये केवळ 9.5 गुण मिळाले.
चीननं जिंकलं सुवर्णपदक : अंतिम स्पर्धेत 8 नेमबाजांनी सहभाग घेतला. चीनच्या लिहाओ शेंगनं या स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकलं. लिहाओ शेंगनं 252.2 गुण मिळवले आणि ऑलिम्पिक विक्रम केला. तर स्वीडनच्या व्हिक्टर लिंडग्रेननं 251.4 गुणांसह रौप्यपदक जिंकलं, तर क्रोएशियाच्या मॅरिक मिराननं 230 गुणांसह कांस्यपदक जिंकलं.
अर्जुन बबुताची अंतिम फेरीतील कामगिरी :
- पहिली सिरीज : 10.7, 10.2, 10.5, 10.4, 10.6, एकूण : 52.4 गुण
- दुसरी सिरीज : 10.7, 10.5, 10.4, 10.6, 10.4, एकूण : 52.6 गुण
- उर्वरित 10 शॉट्स : 10.6, 10.8, 9.9, 10.6, 10.2, 10.7, 10.5, 10.1, 10.5, 9.5
अर्जुन बबुतानं यापुर्वी मिळवलेली पदकं :
- आशियाई चॅम्पियनशिप, कोरिया (2023) - 10 मीटर एअर रायफल वयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक आणि देशासाठी ऑलिम्पिक 2024
- वर्ल्ड चॅम्पियनशिप, कैरो (2022) - 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक
- ISSF विश्वचषक, चांगवॉन (2022) - वैयक्तिक आणि पुरुषांच्या सांघिक स्पर्धांमध्ये 2 सुवर्णपदकं
- जागतिक विद्यापीठ खेळ, चेंगडू (2021) - 10 मीटर एअर रायफल वयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक
नेमबाजीत भारताचे पदक विजेते :
1. राज्यवर्धन सिंह राठोड : रौप्यपदक, अथेन्स ऑलिम्पिक (2004)
2. अभिनव बिंद्रा : सुवर्णपदक, बीजिंग ऑलिम्पिक (2008)
3. गगन नारंग : कांस्यपदक, लंडन ऑलिम्पिक (2012)
4. विजय कुमार : रौप्यपदक, लंडन ऑलिम्पिक (2012)
5. मनु भाकर : कांस्यपदक, पॅरिस ऑलिम्पिक (2024)
हेही वाचा :