ETV Bharat / sports

बलराज पनवारनं रचजला इतिहास; ऑलिम्पिकमध्ये 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय - Paris Olympics 2024

Paris Olympics 2024 Rowing : बलराज पनवारनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रोइंगमध्ये इतिहास रचला आहे. पुरुष एकेरीच्या स्कल्स उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.

Paris Olympics 2024 Rowing
बलराज पनवार (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jul 28, 2024, 2:49 PM IST

Updated : Jul 28, 2024, 3:20 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 Rowing : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रोइंगमध्ये रविवारी बलराज पनवारनं इतिहास रचला आहे. पुरुष एकेरीच्या स्कल्स उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. पॅरिस 2024 मधील भारताचा एकमेव रोवर बलराज पनवारनं रविवारी पुरुष एकेरी स्कल्सच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यानं मोनॅकोच्या क्वेंटिन अँटोगानेलीच्या मागं 7:12:41 च्या वेळेसह दुसरं स्थान पटकावलं. त्यांच्या रिपेचेज गटातील इतर 3 स्पर्धक उपांत्य फेरीत E/F पर्यंत पोहोचले.

मंगळवारी होणार उपांत्यपूर्व फेरीचा सामना : पहिलंच ऑलिम्पिक खेळत असलेला बलराज पनवार आता मंगळवारी पुरुष एकेरी स्कल्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. हा सामना 30 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.40 वाजता खेळवला जाईल.

बलराजला इतिहास घडवण्याची संधी : बलराजला आता ऑलिम्पिक इतिहासातील कोणत्याही ऑलिम्पिक रोइंग स्पर्धेत भारताची सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्याची संधी असेल. हा विक्रम सध्या पुरुषांच्या लाइटवेट दुहेरी स्कल्स जोडी अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांच्या नावावर आहे. त्यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील त्यांच्या स्पर्धेत 11 वं स्थान मिळविलं होतं.

बलराजकडून पदकाची आपेक्षा : बलराज पनवारनं गेल्या वर्षी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना येथील हांगझोऊ इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम अ मध्ये चौथं स्थान पटकावलं होतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बलराजकडून भारताला ऑलिम्पिक पदकाची आशा आहे. पनवारची आतापर्यंतची कामगिरी पाहता तो भारताला कांस्यपदक मिळवून देऊ शकतो, असं दिसतं.

दिवसाची चांगली सुरुवात : दरम्यान ऑलिम्पिकमध्ये भारताची आजची सुरुवात चांगली झाली. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. सिंधूनं महिला एकेरीच्या ग्रुप- M मध्ये पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 111व्या स्थानी असलेल्या मालदीवच्या फातिमाथ नबाहा अब्दुल रझाकचा सरळ सेटमध्ये पराभव केला.

हेही वाचा :

  1. पीव्ही सिंधूची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी; महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात मालदीवच्या रझाकचा अवघ्या 29 मिनिटांत पराभव - Paris Olympics 2024
  2. ऑलिम्पिकमध्ये कॅनडाच्या महिला फुटबॉल संघाला मोठा धक्का; सहा गुणांची कपात, तीन प्रशिक्षकांवरही बंदी, काय आहे कारण? - Paris Olympics 2024

Last Updated : Jul 28, 2024, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.