ETV Bharat / sports

पीव्ही सिंधूची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी; महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात मालदीवच्या रझाकचा अवघ्या 29 मिनिटांत पराभव - Paris Olympics 2024

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jul 28, 2024, 1:28 PM IST

Updated : Jul 28, 2024, 1:55 PM IST

Paris Olympics 2024 Badminton : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. महिला एकेरीच्या ग्रुप- M मध्ये पहिल्या सामन्यात तिनं मालदीवच्या फातिमाथ नबाहा अब्दुल रझाकचा सरळ सेटमध्ये पराभव केला.

Paris Olympics 2024 Badminton
पीव्ही सिंधू (ETV Bharat File Photo)

पॅरिस Paris Olympics 2024 Badminton : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. सिंधूनं महिला एकेरीच्या ग्रुप- M मध्ये पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 111व्या स्थानी असलेल्या मालदीवच्या फातिमाथ नबाहा अब्दुल रझाकचा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिला सेट 21-9 असा जिंकल्यावर दुसरा सेट 21-6 असा जिंकत मालदीवच्या रझाकवर एकहाती विजय मिळवला. सिंधूनं सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदकं जिंकली आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूकडून यंदा सुवर्णपदकाची सर्वांना अपेक्षा आहे.

दोन सामन्यांमधला दुसरा विजय : दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूनं पहिल्या सेटमध्ये 14 गुण मिळवले तर दुसऱ्या सेटमध्ये तिनं 18 गुण मिळवले. सिंधूचा मालदीवच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्धच्या दोन सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे. याआधी तिनं 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही मालदीवच्या फातिमाथ नबाहा अब्दुल रझाकवर सरळ सेटमध्ये विजय मिळवला होता.

सिंधूनं पहिला सेट 21-9 नं जिंकला : जागतिक क्रमवारीत 13व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या पीव्ही सिंधूनं पहिल्या सेटमध्ये संथ सुरुवात केली आणि प्रतिस्पर्धी खेळाडूला अनेक सोप्या संधी दिल्या. सेटच्या सुरुवातीला स्कोअर 3-3 असा बरोबरीत होता. मात्र यानंतर सिंधूनं मालदीवच्या खेळाडूला एकही संधी दिली नाही आणि मध्यांतरापर्यंत तिनं 11-4 गुणांसह 7 गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ब्रेकनंतर सिंधूनं चमकदार कामगिरी सुरु ठेवत पहिला सेट 21-9 असा जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये शानदार कामगिरी : भारताची अव्वल शटलर पीव्ही सिंधू दुसऱ्या सेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होती. जागतिक क्रमवारीत 99 व्या क्रमांकावर असलेल्या मालदीवच्या अब्दुल रझाककडं सिंधूच्या बुलेटसारख्या स्मॅशचं उत्तर नव्हतं. सिंधूनं दुसरा सेट 21-6 असा जिंकला. काही चुका वगळता सिंधूनं संपूर्ण सामन्यात चमकदार कामगिरी केली.

पुढील सामना 31 जुलैला : 29 वर्षीय पीव्ही सिंधूचा पुढील गट सामना बुधवारी 31 जुलै रोजी होणार आहे.

हेही वाचा :

  1. ऑलिम्पिकमध्ये कॅनडाच्या महिला फुटबॉल संघाला मोठा धक्का; सहा गुणांची कपात, तीन प्रशिक्षकांवरही बंदी, काय आहे कारण? - Paris Olympics 2024
  2. बॉक्सर प्रीतीचा विजयी पंच; किम आन्हाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत मिळवलं स्थान - Paris Olympics 2024

Last Updated : Jul 28, 2024, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.