ETV Bharat / sports

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 'गोल्डन बॉय'कडे मोठी जबाबदारी; भारताच्या 28 सदस्यीय ॲथलेटिक्स संघाचं करणार नेतृत्व - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics : भारताचा गोल्डन बॉय आणि गतविजेता नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे. ॲथलेटिक्स संघात 17 पुरुष आणि 11 महिला खेळाडूंचा समावेश आहे.

Neeraj Chopra
Neeraj Chopra (Source - ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 12:16 PM IST

Neeraj Chopra Paris Olympics 2024 : भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशननं (AFI) 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी 28 सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाची घोषणा केली आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी डायमंड लीग स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय ॲथलेटिक्स संघात 17 पुरुष आणि 11 महिला खेळाडूंचा समावेश आहे.

'या' खेळाडूंकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा : भारतीय पुरुषांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत आपली चमक दाखवणारा महाराष्ट्राचा अविनाश साबळे, तेजिंदरपाल सिंग तूर आणि स्प्रिंट हर्डल्स शर्यतीत सहभागी झालेली महिला खेळाडू ज्योती याराजी यांचा समावेश आहे. पुरुषांच्या 4x400 मीटर रिले संघात मुहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अमोज जेकब आणि राजेश रमेश यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करण्याची अपेक्षा असेल. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान ट्रॅक आणि फील्ड स्पर्धा होणार आहेत.

गेल्या महिन्यातच पटकावलं सुवर्णपदक : नीरज चोप्रा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यानं गेल्या महिन्यात 18 जून रोजी फिनलंडमधील तुर्कू येथे झालेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. सुवर्णपदक जिंकून नीरजनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 पूर्वी आपण फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिलेत. फिनलंडच्या टोनी केरानेननं (84.19 मीटर) दुसरं स्थान मिळवून रौप्यपदक जिंकलं. फिनलंडच्या ऑलिव्हर हेलँडरनं तिसरं स्थान (83.96 मीटर) मिळविलं.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी 28 सदस्यीय भारतीय ऍथलेटिक्स संघ

  • पुरुष संघ : अविनाश साबळे (3,000 मीटर स्टीपलचेस), नीरज चोप्रा, किशोर कुमार जेना (भालाफेक), तजिंदरपाल सिंग तूर (शॉट पुट), प्रवीण चित्रवेल, अब्दुल्ला अबुबकर (तिहेरी उडी), अक्षदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग बिश्त (20 किमी वॉक ), मोहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अमोज जेकब, संतोष तमिलरासन, राजेश रमेश (4x400 रिले), मिझो चाको कुरियन (4x400 रिले), सूरज पनवार (वॉक रेस), सर्वेश अनिल कुशारे (उंच उडी).
  • महिला संघ : किरण पहल (400 मी.), पारुल चौधरी (3,000 मीटर आणि 5,000 मीटर स्टीपलचेस ), ज्योती याराजी (100 मीटर अडथळा शर्यत), अन्नू राणी (भालाफेक), आभा खटुआ (शॉट पुट), ज्योतिका श्री दांडी, सुभा व्यंकटेशन, विठिया रामराज, पूवम्मा एम आर (4x400m रिले), प्राची (4x400m), प्रियंका गोस्वामी (20km वॉक).

हेही वाचा

  1. टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीनंतर अनेकांना भोवळ; मरीन ड्राईव्हवर काय होती परिस्थिती? - Team India Mumbai Victory Parade
  2. टी २० विश्वविजेता टीम इंडियाचा मुंबईत विजयोत्सव, लाखो क्रिकेटप्रेमी उतरले रस्त्यावर - Team India Mumbai Victory Parade
  3. टीम इंडियाचा रोड शो, देशाच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेट प्रेमींची मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर प्रचंड गर्दी, टीम इंडियाला १२५ कोटींचा चेक प्रदान - Team India Road Show
  4. मरिन ड्राइव्हवर चाहत्यांची गर्दी : भारतीय संघाच्या विजय परेडसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था - TEAM INDIA VICTORY PARADE IN MUMBAI

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.