पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची मोहीम आतापर्यंत फारशी चांगली राहिलेली नाही. केवळ 3 कांस्यपदकांसह भारत सध्या पदकतालिकेत 60 व्या स्थानावर आहे. भारताच्या 140 कोटी देशवासीयांच्या नजरा आता स्टार भालाफेकपटू आणि सध्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा याच्यावर खिळल्या आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक बनला आहे. नीरज इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
नमस्कार, Paris! 🇮🇳🇫🇷
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) July 30, 2024
Excited to finally reach the Olympic Games village. #Paris2024 pic.twitter.com/qinx6MsMDl
नीरज चोप्राचा पॅरिसमध्ये कधी होणार सामना : स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आज (6 ऑगस्ट) रोजी भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहे. गट अ ची पात्रता फेरी दुपारी 1:50 वाजता सुरु होईल, आणि गट ब त्याच दिवशी दुपारी 3:20 वाजता सुरू होईल. पात्रता फेरीतून नीरजनं प्रगती केल्यास तो 8 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11:55 वाजता सुरु होणाऱ्या अंतिम फेरीत सहभागी होईल.
Neeraj Chopra practicing hard!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 3, 2024
- Everyone is waiting for 8th August to see Neeraj in action. 🇮🇳pic.twitter.com/thRevK21dU
नीरज चोप्राचा पॅरिस ऑलिम्पिकमधील सामना कसा पाहायचा : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चं भारतात स्पोर्ट्स 18 नेटवर्क टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपण केलं जात आहे. तसंच तुम्ही जीओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता, जे पूर्णपणे विनामूल्य आहे. तुम्ही यावरही नीरज चोप्राचा थेट सामना पाहू शकता.
" neeraj chopra: time to rewrite history once again! 🔥
— Mr. RP (@ranjitp5252) August 3, 2024
all eyes are on the first #GOLD of this #ParisOlympics2024
Let's Cheer for Him, India 🇮🇳
Our Hopes are Sky-High! 🥹 🙌 pic.twitter.com/HpI7CCkb6K
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रचला होता इतिहास : नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये ऍथलेटिक्समध्ये भारताला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकवून देत इतिहास रचला होता. टोकियो गेम्समधील त्याच्या प्रभावी कामगिरीनंतर, नीरजनं 2022 मध्ये डायमंड लीगचं विजेतेपद आणि 2023 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून चमक दाखवली. आता तो भालाफेकमध्ये सध्याचा विश्वविजेता म्हणून पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला आहे.
140 कोटी भारतीयांना सुवर्णपदकाची आशा : भारताला पुन्हा एकदा नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची आशा आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या इराद्यानं भारताची नजर नीरज चोप्रावर असेल. देशाच्या अपेक्षांचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन नीरज पुन्हा एकदा जगाशी सामना करण्यास सज्ज झाला आहे.
किशोर जेना देखील सहभागी होणार : नीरज सोबत किशोर जेना देखील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जेनानं नीरजला मागं टाकत 2023 च्या हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकलं होतं.
हेही वाचा :