ETV Bharat / sports

ऑलिम्पिकमध्ये महिला टेबल टेनिस संघाची मोहीम संपुष्टात; जर्मनीकडून एकहाती पराभव - paris olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 : भारताच्या महिला टेबल टेनिस संघाची ऑलिम्पिक मोहीम संपली आहे. भारतीय संघाचा जर्मनीकडून 1-3 असा पराभव झाला आहे. परिणामी भारताचं एक पदक हुकलं आहे.

Paris Olympics 2024
महिला टेबल टेनिस संघ (AP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 7, 2024, 4:47 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारतीय महिला टेबल टेनिस संघाची मोहीम संपुष्टात आली आहे. भारताचा जर्मनीकडून 1-3 असा पराभव झाला, यासह भारतीय त्रिकुट उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडले. भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची सुवर्णसंधी होती. पण जर्मनीविरुद्धच्या पराभवानंतर ते 2024 च्या ऑलिम्पिकमधून बाहेर पडले आहेत.

पहिला गेम : भारतासाठी पहिला गेम अर्चना कामथ आणि श्रीजा अकुला यांनी जर्मनीच्या वान युआन आणि शान झियाओना विरुद्ध खेळला. या सामन्यात भारतीय जोडीचा 1-3 असा पराभव झाला. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये भारताचा 5-11 असा पराभव झाला. मात्र, भारतीय जोडीनं दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन करत 11-8 असा विजय मिळवला. यानंतर जर्मनीनं 10-11 आणि 6-11 नं विजय मिळवला.

दुसरा गेम : भारतासाठी मनिका बत्रा आणि जर्मनी कॉफमन ॲनेट यांनी दुसरा गेम खेळला. यात भारताला 1-3 नं पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या गेममध्ये भारतानं पहिला सेट 11-5 नं जिंकला पण उर्वरित तीन सेट अनुक्रमे 5-11, 7-11, 5-11 नं गमावले.

तिसरा गेम : भारताचा तिसरा गेम अर्चना कामथ आणि जर्मनीच्या शान जिओना यांच्यासोबत झाला. भारतानं हा गेम 1-3 नं गमावला. या गेममध्ये भारतानं पहिला सेट 19-17 नं जिंकला पण दुसरा सेट 1-11 नं गमावला, त्यानंतर त्यांनी पुनरागमन करत तिसरा सेट 11-5 नं जिंकला. तर चौथ्या सेटमध्ये जर्मनीनं भारताचा 9-11 असा पराभव केला.

चौथा गेम : चौथा गेम भारताची श्रीजा अकुला आणि जर्मनीची कॉफमन ऍनेट यांच्यात झाला. भारतानं हा गेम 0-3 असा गमावला. या गेममध्ये भारतानं पहिला सेट 6-11, दुसरा सेट 7-11 आणि तिसरा सेट 7-11 नं गमावला.

हेही वाचा :

  1. ...जेव्हा बॉक्सर मेरी कोमनं अवघ्या 4 तासांत 2 किलो वजन केलं होतं कमी; काही मिनिटांत खेळाडू कसं कमी करतात वजन? - vinesh phogat disqualified
  2. शेवटचा एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत बरोबरी राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न; संघात दोन मोठे बदल - SL vs IND 3rd ODI
  3. ऑलिम्पिकमधून अपात्र झालेल्या विनेशसाठी पंतप्रधान मोदींची भावनिक पोस्ट, म्हणाले... - PM Modi on Vinesh Phogat

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.