पॅरिस Paris Olympics 2024 Archery : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील तिरंदाजी सांघिक स्पर्धेत रविवारी भारतीय महिला तिरंदाजी संघाला नेदरलँड्सविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला. अंकिता भक्त, भजन कौर आणि दीपिका कुमारी यांनी या सामन्यात अतिशय खराब कामगिरी केली.
'News Flash: Archery: India lose to Netherlands 0-6 in QF of Women's Team event.
— India_AllSports (@India_AllSports) July 28, 2024
Disappointing performance by the trio (Deepika, Ankita & Bhajan). #Archery #Paris2024withIAS #Paris2024withIAS pic.twitter.com/JRBFb2ohNQ
महिला तिरंदाजी संघाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव : अंकिता भक्त, भजन कौर आणि दीपिका कुमारी यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला तिरंदाजी संघाला रविवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तिरंदाजी सांघिक स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतीय महिला तिरंदाजी संघाचा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध 6-0 असा पराभव झाला. चौथ्या मानांकित भारतानं तीन सेटमध्ये केवळ 51, 49 आणि 48 गुण मिळवले. त्यापैकी पाच वेळा 10 गुण मिळवले. ऑलिम्पिक पदक विजेत्या गॅबी श्लोसरच्या नेतृत्वाखालील नेदरलँड संघानं प्रत्युत्तरात केवळ तीन 10 गुण मिळवले, तर लेस इनव्हॅलिड्समध्ये सलग 9 गुण मिळवले. भारतीय संघ या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध तग शकला नाही आणि पराभूत झाला.
नेदरलँड विरुद्ध महिला सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय तिरंदाजांची वयक्तिक कामगिरी :
- भजन : 10 9 10 9 10 8 | 56 गुण
- दीपिका : 7 9 8 6 8 10 | 48 गुण
- अंकिता : 7 9 10 6 4 8 | 44 गुण
दीपिका कुमारीची खराब कामगिरी : पॅरिसमध्ये महिला तिरंदाजी संघाकडून भारताला पदकाची आशा होती. परंतु महिलांचा तिरदाजी संघ 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. भारताला अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारीकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या. पण, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही तिनं अनेक वाईड शॉट्स घेतले आणि पराभवानं आपली मोहीम संपवली. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष संघ आणि मिश्र संघ तिरंदाजीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील. त्याच वेळी, देशातील सर्वोत्तम तिरंदाज वैयक्तिक स्पर्धांमध्ये देखील भाग घेताना दिसतील. भारताला आपल्या तिरंदाजांकडून ऑलिम्पिक पदकाच्या आशा आहेत.
हेही वाचा :