नवी दिल्ली Aman Sehrawat In Final : ऑलिम्पिकमध्ये असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या भारताची पदकाकरिता कुस्तीपटूंवरच मदार आहे. विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर अनेक भारतीयांची पदकाकरिता अमन सेहरावकडून अपेक्षा आहेत. मात्र, सेहरावचा उपांत्य फेरीत पराभव झाला.
अमन सेहरावत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानं पुरुष गटात रौप्य आणि सुवर्णपदकाच्या भारताच्या पूर्णपणे मावळल्या आहेत. 57 किलो गटात खेळणाऱ्या अमनचा उपांत्य फेरीत जपानच्या हिगुची रेकडून पराभव झाला. हिगुची हा रिओ ऑलिम्पिक 2016 चा रौप्य पदक विजेता कुस्तीपटू आहे. जपानी खेळाडूच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं सेहरावचा टिकाव लागला नाही.
अमन सेहरावतनं यापूर्वी उपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरीत चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठल्यानंतर कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये एकही गुण न मिळवता प्रतिस्पर्ध्याला पराभूत करणाऱ्या अमनला हा सामना 10-0 असा पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये अमननं तांत्रिक गुणांवर अल्बेनियन खेळाडूचा 12-0 असा पराभव केला होता.
- अमन सेहरावतला आता कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. उपांत्य फेरीतील पराभवानंतर अमन आता कांस्यपदकासाठी डॅरियन टोई क्रूझविरुद्ध खेळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री 9.45 वाजता खेळण्यात येणार आहे. भारताला आता अमन सेहरावतकडून कांस्यपदकाची आशा असेल.
फक्त दोन कुस्तीपटुंचा अंतिम सामन्यात प्रवेश- यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतातील 6 कुस्तीपटू सहभागी झाले. त्यापैकी आतापर्यंत फक्त विनेश फोगट आणि अमन यांनाच उपांत्य फेरी गाठता आली आहे. उपांत्य फेरीतही विजय मिळवत विनेशनं अंतिम फेरीत प्रवेश केला. पण, 50 किलोहून केवळ 100 ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. यानंतर तिनं ऑलिम्पिक समितीकडे अपील केले. कुस्तीपटूपैकी आखिल पंघाल, निशा दहिया, अंशू मलिक हे ऑलिम्पिकमधून बाहेर पडले आहेत. तर रितिका हुड्डा ही उद्या सामना खेळणार आहे.
हेही वाचा -