ETV Bharat / sports

पाकिस्तानचं एक पदक भारताच्या सहा पदकांवर पडलं भारी; 40 वर्षांनंतर भारतावर आली 'ही' नामुष्की - PARIS OLYMPIC 2024

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 10, 2024, 1:39 PM IST

Updated : Aug 10, 2024, 3:34 PM IST

Paris Olympic Medal Tally : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची कामगिरी टोकियो ऑलिम्पिकपेक्षाही निराशाजनक राहिली आहे. पदकतालिकेत भारत सध्या पाकिस्तानपोक्षाही खालच्या स्थानावर आहे. ऑलिम्पिकमध्ये 40 वर्षांनंतर भारतानं पाकिस्तानपेक्षा वाईट कामगिरी केली आहे. (India at Olympics 2024)

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

पॅरिस Paris Olympic Medal Tally : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा आज शेवटचा दिवस आहे. ऑलिम्पिक 2024 चा समारोप समारंभ उद्या 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. भारतानं यंदा ऑलिम्पिकमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. इतकंच नाही तर पदकतालिकेत भारत पाकिस्तानच्याही मागे आहे. विशेष म्हणजे तब्बल 40 वर्षांनंतर भारत पदकतालिकेत पाकिस्तानच्या मागे आहे. (How Olympics Medal Tally Decides)

भारत कितव्या स्थानावर : यापूर्वी 1984 मध्ये पाकिस्तान पदकतालिकेत भारतापेक्षा वरच्या स्थानावर होता. त्यावर्षी पाकिस्ताननं सुवर्णपदक जिंकलं होतं तर भारताला आपलं खातंही उघडता आलं नव्हतं. 1984 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान भारतापेक्षा वरच्या स्थानावर पोहोचला आहे. सध्या पदकतालिकेत पाकिस्तान 58व्या तर भारत 69व्या स्थानावर आहे. 1984 मध्ये पाकिस्तान 25व्या स्थानावर होता.

नदीमच्या एका सुवर्णापदकानं भारताला टाकलं मागे : भारतानं या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत केवळ 6 पदकं जिंकली असून एकही सुवर्णपदक जिंकलेलं नाही. त्याचवेळी पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं भालाफेकमध्ये ऑलिम्पिक विक्रम रचून सुवर्णपदक पटकावलं आणि भारताच्या नीरज चोप्रानं दुसरं स्थान मिळवून रौप्यपदक पटकावलं. नदीमनं सुवर्णपदक जिंकल्यानं पाकिस्ताननं पदकतालिकेत भारताच्या पुढे मजल मारली.

पाकिस्तानच्यावर जाण्याची शेवटची संधी : आज शेवटच्या दिवशी रितिका हुड्डा या भारतीय महिला कुस्तीपटू आणि गोल्फचा निकाल अजून यायचा आहे. जर तीही बाहेर पडली तर यावेळी भारताची मोहीम सुवर्णपदकाविना संपुष्टात येईल. याशिवाय या दोन्ही स्पर्धांमध्ये एकतरी सुवर्णपदक जिंकल्यास भारत पदकतालिकेत पाकिस्तानला सहज मागं टाकू शकतो.

सुवर्णपदकानं ठरवलं जातं पदकतालिकेतील स्थान : ऑलिम्पिक पदकतालिकेत, सुवर्णपदकाच्या आधारे पदकतालिकेत स्थान निश्चित केलं जातं. सर्वाधिक सुवर्णपदकं मिळवणारा देश पदकतालिकेत अव्वल असतो. सुवर्णपदकासाठी बरोबरी झाल्यास, रौप्यपदकाच्या आधारे स्थान निश्चित केलं जाईल. याशिवाय रौप्यपदकही सारखे असल्यास एकूण पदकांच्या आधारे स्थान निश्चित केलं जातं. संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये पाकिस्ताननं आतापर्यंत केवळ एकच पदक जिंकलं आहे, तर भारताच्या खात्यात एका रौप्यपदकासह एकूण 6 पदकं जिकंली आहेत.

चीन आणि अमेरिका यांच्यात सुवर्णपदकाची स्पर्धा : इतर देशांबद्दल बोलायचं झालं तर पदकतालिकेत अमेरिका अव्वल आहे. अमेरिकेनं आतापर्यंत 33 सुवर्ण आणि 39 रौप्यपदकांसह तितक्याच कांस्य पदकांची कमाई केली आहे. त्यांची एकूण 111 पदकं आहेत. तर चीन 33 सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चीनकडं 27 रौप्य आणि 23 कांस्यपदकांसह एकूण 83 पदकं आहेत, जो दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया 18, जपान 16 आणि ग्रेट ब्रिटन 14 सुवर्णपदकांसह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

हेही वाचा :

  1. विनेश फोगटप्रमाणेच अमन सेहरावतचंही वाढलं होतं वजन, 10 तासांत 4.6 किलो वजन कमी करत रचला इतिहास; कसा घडला 'चमत्कार'? - Paris Olympics 2024
  2. पॅरिसमध्ये 21 वर्षीय अमननं रचला इतिहास! अखेर भारताला कुस्तीत पदक मिळालं - Paris 2024 Olympics

Last Updated : Aug 10, 2024, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.