ETV Bharat / sports

पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना भारतात 'इथं' दिसणार लाईव्ह, करावं लागणार एक काम - PAKW vs SAW 1st T20I Live in India - PAKW VS SAW 1ST T20I LIVE IN INDIA

Pakistan Women vs South Africa Women 1st T20I Live Streaming : पाकिस्तान महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे.

Pakistan Women vs South Africa Women 1st T20I Live
Pakistan Women vs South Africa Women 1st T20I Live (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 16, 2024, 2:28 PM IST

मुलतान (पाकिस्तान) Pakistan Women vs South Africa Women 1st T20I Live Streaming : पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका आज 16 सप्टेंबरपासून (सोमवार) मुलतान क्रिकेट स्टेडियम, मुलतान इथं खेळवली जाईल. लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषकाची एक प्रकारे तयारी करण्यासाठी पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाचा सामना करेल. ही 3 सामन्यांची मालिका संयुक्त अरब अमिरातीमध्ये 3 ते 20 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या आगामी ICC महिला T20 विश्वचषक 2024 च्या संघांच्या तयारीचा भाग असेल.

पाकिस्तानी परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेऊन आगामी स्पर्धेसाठी त्याचा योग्य वापर करण्याचा वोल्वार्डच्या नेतृत्वाखालील आफ्रिका संघ प्रयत्न करेल. शुक्रवारी इथं दाखल झालेला दक्षिण आफ्रिका संघ मालिकेपूर्वी सराव सत्रात भाग घेणार आहे.

  • पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना कधी आणि कुठं खेळली जाईल?

दक्षिण आफ्रिका महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यात मुलतान क्रिकेट स्टेडियमवर 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत तीन सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. यातील पहिला सामना आज 16 सप्टेंबर रोजी होणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सुरु होईल.

  • पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना मालिका कुठं पाहायचा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान महिला संघातील पहिला टी-20 सामना भारतात प्रसारित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. ज्यामुळं पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचं प्रसारण टीव्हीवर थेट उपलब्ध होणार नाही.

  • पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला T20 सामना लाईव्ह स्ट्रीम कशावर?

पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या T20 सामन्याच प्रसारण टीव्हीवर थेट उपलब्ध होणार नाही. पण चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की या रोमांचक सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. जिथं चाहते सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.

मालिकेसाठी दोन्ही संघ :

  • पाकिस्तान महिला क्रिकेट संघ : फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली (यष्टिरक्षक), नशरा संधू, निदा दार, ओसामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सय्यदा आरुब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन.
  • दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नदिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, माईके डी रिडर (यष्टिरक्षक), अयांडा हलुबी, सिनालो जाफ्ता (यष्टिरक्षक), मारिझान कॅप, अयाबोंगा खाका, सुने लुस, नॉनकुलुलेको मलाबा, सेश्नी नायडू, तुमी सेखुखुने, चोले ट्रायॉन.

हेही वाचा :

  1. गौतम गंभीर ट्रकवर चढून ट्रक ड्रायव्हरची कॉलर पकडतो तेव्हा... - Gautam Gambhir Fight
  2. भारत-बांगलादेश मालिकेत 'हा' स्टार खेळाडू राहणार खेळापासून दूर; BCCI घेणार मोठा निर्णय, कारण काय? - IND vs BAN T20I Series

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.