रावळपिंडी (पाकिस्तान) Mohammad Rizwan Babar Azam Viral Video : पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननं बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नाबाद 171 धावांची शानदार खेळी केली. 239 चेंडूत खेळलेल्या त्याच्या खेळीमुळं पाकिस्ताननं 448/6 अशी मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर कर्णधार शान मसूदनं संघाचा डाव घोषित केला. रिझवानच्या नाबाद शतकानं पाकिस्तानला 3 बाद 16 च्या खराब स्कोअरमधून बाहेर काढलं आणि सौद शकीलसह संघाला मजबूत स्थितीत आणलं, ज्यानं 141 धावांची शानदार खेळी देखील केली.
Bangladesh openers see off a testing period of play after Pakistan called for declaration late on Day 2 🙌#WTC25 | 📝 #PAKvBAN: https://t.co/EUbigvmymm pic.twitter.com/gUD0nZ4O7B
— ICC (@ICC) August 22, 2024
रिझवाननं बाबरच्या दिशेनं फेकली बॅट : आपल्या शानदार खेळीनंतर रिझवान पॅव्हेलियनमध्ये परतत असताना रिझवाननं माजी कसोटी कर्णधार बाबर आझमसोबत एक भावनिक क्षण शेअर केला. ड्रेसिंग रुममध्ये परत जात असताना, रिझवाननं बाबरकडे बॅट फेकली, ज्यावर संघाचा टी-20 कर्णधार बॅट पकडताच हसला आणि विनोद केला. रिजवानच्या शानदार खेळीचं कौतुक करण्यासाठी पाकिस्तानचे खेळाडू सीमारेषेभोवती जमले आणि दोघांमधील या हलक्या क्षणाचे साक्षीदार झाले. या मजेदार क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Love em ♥️ pic.twitter.com/NU9bB7yzsF
— Zahra🇵🇰 (@itsZahra2_0) August 22, 2024
रिझवान हा ठरला ट्रबलशूटर : कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तान संघ 3 बाद 16 अशा धावसंख्येसह संघ संकटात सापडला होता. तेव्हा सौद शकीलसह रिजवाननं शानदार पुनरागमन केलं. या दोघांनी 240 धावांची भागीदारी केली, ज्यामुळं पाकिस्तान मजबूत स्थितीत आला. शकील बाद झाला तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या 354 धावा होती, रिझवाननं आघा सलमान (19) सोबत 44 धावा जोडल्या. सलमान आऊट झाला तेव्हा ड्रेसिंग रुममधून वेगानं खेळण्याच्या सूचना दिल्या जात होत्या आणि शाहीन आफ्रिदीनं वेळ वाया न घालवता क्रीझवर येताच 24 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह एकूण 29 धावा केल्या. .
That is all from the first innings. Pakistan declare at 4️⃣4️⃣8️⃣-6️⃣ 🏏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 22, 2024
Rizwan remains unbeaten at 1️⃣7️⃣1️⃣ 👏#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/cjVlwfMxbF
मसूदनं द्विशतकापूर्वीच केला डाव घोषित : यानंतर मसूदनं डाव घोषित करण्याचे संकेत दिले. यावेळी रिजवान 171 धावा करुन नाबाद होता. या घोषणेनं चाहत्यांना धक्का बसला आणि सोशल मीडियावर अनेकांनी असा आग्रह धरला की पाकिस्तानचा कर्णधार रिझवानचं द्विशतक पूर्ण होण्याची वाट पाहू शकला असता. मात्र, उपकर्णधार शकीलनं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, रिजवानला घोषणेच्या 1 तास आधी कळवण्यात आलं होतं.
हेही वाचा :