3 Wickets in 2 Balls : क्रिकेटच्या मैदानावर अनेक अनोखे विक्रम केले गेले आहेत, परंतु काही विक्रम असे आहेत ज्यांच्या बनण्याची शक्यता खूपच कमी आहे. क्रिकेटमध्ये सलग 3 चेंडूंवर हॅटट्रिक विकेट घेतली जाते, पण तुम्ही कधी ऐकलं आहे का, की एखाद्या गोलंदाजानं 2 चेंडूंवर हॅटट्रिक विकेट घेतल्याचं? मात्र क्रिकेट विश्वात हे घडले आहे. भारतीय फिरकी गोलंदाज प्रवीण तांबे यानं IPL मध्ये असा अनोखा पराक्रम केला आहे. IPL च्या इतिहासात तांबे हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याच्या नावावर 2 चेंडूत हॅट्ट्रिक विकेट घेण्याचा पराक्रम नोंदवला गेला आहे.
Pravin Tambe,they are the only bowlers who have taken 2-ball hat trick .#Cricbuzzlive #CricbuzzLIVE
— Pritish Kumar Sahoo (@pritish253) March 30, 2019
कशा घेतल्या दोन चेंडूत तीन विकेट : तांबेनं 2014 च्या IPL मध्ये हा पराक्रम केला होता. 2014 मध्ये, तांबे राजस्थान रॉयल्स (RR) संघाचा सदस्य होता, त्यानं कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) हा अनोखा पराक्रम केला. प्रत्यक्षात असं घडलं की KKR च्या डावाच्या 16व्या षटकात तांबेनं पहिला चेंडू टाकला जो गुगली होता, ज्यावर मनीष पांडे यष्टीचीत झाला. तांबेनं टाकलेला चेंडू पांडेनं पुढं सरकत खेळण्याचा प्रयत्न केला पण हा चेंडू गुगली होता आणि स्टंपच्या बाहेरही होता. अशा स्थितीत मनीष पांडे चेंडू खेळण्यात अयशस्वी ठरला आणि यष्टिरक्षक संजू सॅमसननं चेंडू सहज पकडला आणि यष्टीचीत केली. विशेष म्हणजे तांबेला ही विकेट वाईड बॉलवर मिळाली. यानंतर तांबेनं पहिल्या कायदेशीर चेंडूवर युसूफ पठाणला बाद केलं. या षटकाच्या दुसऱ्या कायदेशीर चेंडूवर, गोलंदाजानं रायन टेन डोशेटला एलबीडब्ल्यू बाद करुन विकेट्सची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तांबेनं टाकलेला पहिला चेंडू वाईड असला तरी, त्यानं घेतलेली ही हॅट्ट्रिक विकेट आजपर्यंत आयपीएलमध्ये तांबेच्या या विक्रमाची पुनरावृत्ती कोणीही केलेली नाही.
BCCI नं घातली बंदी : प्रवीण तांबेनं IPL मध्ये एकूण 33 सामने खेळले असून या कालावधीत तो 28 विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे. 2020 च्या लिलावात KKR नं त्याला 20 लाखात विकत घेतलं होतं पण BCCI नं त्याला IPL खेळण्यास बंदी घातली आहे. वास्तविक, तांबेनं देशाबाहेर जाऊन परवानगी न घेता इतर देशांच्या फ्रँचायझी क्रिकेटमध्ये भाग घेतला होता, त्यामुळं नियमांचं पालन न केल्याने BCCI नं तांबेला IPL मधून निलंबित केलं.
Pravin Tambe won't be allowed to participate in IPL because of playing in the T10 league at UAE. Tambe was picked by Kolkata Knight Riders. #IPL2020
— Johns. (@CricCrazyJohns) February 26, 2020
इसुरु उडानानं केला पराक्रम : मात्र, T20 क्रिकेटमध्ये हा पराक्रम तांबेआधी श्रीलंकेचा गोलंदाज इसुरु उडानानं केला होता. 2010 च्या चॅम्पियन लीग T20 स्पर्धेत इसुरु उडानानं हे केलं होतं. त्यानं या स्पर्धेत सेंट्रल डिस्ट्रिक्टविरुद्ध ही अनोखी कामगिरी केली आहे. उडानानं हॅट्ट्रिक विकेट घेतली ज्यात त्याला वाईड बॉलवर एक विकेट मिळाली होती.
हेही वाचा :