ETV Bharat / sports

"100 टक्के सुवर्णपदक मिळवून देणार...", अविनाश साबळेच्या वडिलांनी व्यक्त केला विश्वास - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Avinash Sable : अविनाश साबळेनं पॅरिस ऑलिम्पिकच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तो अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. अविनाशच्या या कामगिरीवर त्याचे वडील मुकुंद साबले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 7:29 PM IST

Updated : Aug 6, 2024, 9:31 PM IST

बीड Avinash Sable : महाराष्ट्राचा सुपुत्र आणि बीडचा भूमीपुत्र असलेल्या अविनाश साबळेनं पॅरिस ऑलिम्पिकचं मैदान गाजवत नवा इतिहास रचला. अविनाश पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. या संपूर्ण स्पर्धेत अविनाशनं सातत्यपूर्ण कामगिरी करत स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धडक मारली. अशी कामगिरी करणारा अविनाश पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. आपला मुलगा देशाला गोल्ड मेडल मिळवून देणार, असा विश्वास त्याच वडील मुकुंद साबळे यांनी व्यक्त केलाय.

"मला पूर्ण विश्वास आहे की, अविनाश देशाला गोल्ड मेडल मिळवून देणार. सात-आठ वर्षांपासून अविनाशनने खूप मेहनत घेतलीय. जीवाची पर्वा न करता पहाटे तीन वाजता उठून तो सराव करायचा. तो देशाला 100 टक्के सूवर्णपदक मिळवून देणार असा विश्वास आम्हाला आहे." अशा प्रतिक्रिया स्वप्नीलच्या वडिलांनी दिली.

अविनाश साबळेच्या वडिलांनी व्यक्त केला विश्वास (Source- ETV Bharat)

मुलाचा सामना पाहण्याची इच्छा : "अविनाशचा सामना आम्हाला मैदानावर जाऊन पाहायचा आहे. आमची खूप इच्छा आहे. मात्र तिथं कसं जायचं हे आम्हाला माहीत नाही. सामना कुठं आहे? कोणत्या देशात आहे? याबाबत आम्हाला काहीच माहीत नाही. सरकारनं आम्हाला सहकार्य केलं तर आम्हाला डोळ्यांनी सामना पाहण्याचं भाग्य मिळेल." असं अविनाशचे वडील म्हणाले.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय धावपटू अविनाश साबळेनं सोमवारी पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अविनाश या खेळामध्ये 8:15.43 सेकंदाचा वेळ घेत पाचव्या स्थानावर राहिला. यासह या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा साबळे हा भारतातील पहिला खेळाडू ठरला. 7 ऑगस्टला अविनाश अंतिम फेरीत खेळणार आहे. आता अंतिम सामन्यात अविनाश कोणतं पदक मिळवतो? याकडेच कोट्यवधी भारतीयांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा

  1. गोल्डन बॉय नीरज चोप्राचा 'बाहुबली थ्रो', पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक - Paris Olympics 2024
  2. उपांत्य फेरीत भारत-जर्मनी यांच्यात कांटे की टक्कर, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या हेड-टू-हेड आकडेवारी - Paris Olympics 2024
  3. "ऑलिम्पिकमध्ये मेहनत करत नसाल तर..", दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण बॅडमिंटनपटूंच्या खराब कामगिरीवर संतापले - Paris Olympics 2024
  4. 'मराठमोळ्या' अविनाश साबळेनं पॅरिस गाजवलं; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय - Paris Olympics 2024

Last Updated : Aug 6, 2024, 9:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.