वेलिंग्टन Gus Atkinson Hat-trick : वेलिंग्टनच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज गस ऍटिन्सननं हॅट्ट्रिक साधली ज्यात त्यानं किवी संघाचे शेवटचे तीन विकेट लागोपाठ चेंडूत घेतले. या सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 280 धावांवरच मर्यादित होता, त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या खेळात न्यूझीलंड संघाचा दुसरा डाव अवघ्या 125 धावांत आटोपला.
Gus Atkinson is FLYING! 🛫
— England Cricket (@englandcricket) December 6, 2024
☝️ 34.3 | Nathan Smith plays on
☝️ 34.4 | Matt Henry fends to gully
☝️ 34.5 | Tim Southee pinned in front
The first cricketer EVER to take a Test hat-trick at the Basin Reserve. 👏 pic.twitter.com/P49cLnyKqh
तीन वर्षांनंतर एखाद्या गोलंदाजाची कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक : गस एटिंकसनच्या आधी, शेवटच्या वेळी कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम 2021 साली पाहायला मिळाला होता, जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा फिरकी गोलंदाज केशव महाराज यानं वेस्ट इंडिजविरुद्ध हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. आता ॲटिंकसननं हे करण्यात यश मिळवलं असून, इंग्लंडकडून कसोटीत अशी कामगिरी करणारा तो 14 वा खेळाडू ठरला आहे. ॲटिंकसनने आपल्या 9व्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि टीम साऊदी यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचा पराक्रम केला. हेन्री आणि साऊथी गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतले, तर स्मिथनं 14 धावांची खेळी केली. त्याचबरोबर, न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह इथं कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा गस ॲटिंकसन हा पहिला गोलंदाज ठरला आहे.
ARE YOU NOT ENTERTAINED?! pic.twitter.com/hkLaN6Fk1l
— England Cricket (@englandcricket) December 6, 2024
अटिंकसनशिवाय कारसेचेही 4 बळी : यजमान न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या 125 धावांवर आटोपून इंग्लंड संघाने वेलिंग्टन कसोटी सामन्यात आपली पकड मजबूत केली असून, पहिल्या डावाच्या जोरावर त्यांनी 155 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. ॲटिंकसनने हॅट्ट्रिक साधली, तर त्याला ब्रेंडन कारसेकडून गोलंदाजीत पूर्ण साथ मिळाली ज्याने 4 बळीही घेतले. याशिवाय ख्रिस वोक्स आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनाही प्रत्येकी 1 बळी घेण्यात यश आले. गस ऍटकिन्सननं न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 8.5 षटकांत 31 धावा देत हॅट्ट्रिकसह 4 बळी घेतले. या दमदार कामगिरीमुळं न्यूझीलंडचा पहिला डाव 125 धावांवर मर्यादित असतानाच इंग्लंडलाही 155 धावांची भक्कम आघाडी मिळाली.
Hattrick from Gus Atkinson
— Dilkesh (@one_handed17) December 6, 2024
Greet feel for Gas Atkinson
-It was worth it as I got to see a Hat-trick live in international cricket after so long 🏏
Gus Atkinson will be a dangerous bowler to face when India tours England next year 💀#NZvENG
pic.twitter.com/U7cooCbSFY
जगातील 44 गोलंदाजांनी आतापर्यंत हॅट्ट्रिक घेतली आहे. त्यापैकी 3 गोलंदाज आहेत ज्यांनी 2-2 वेळा कसोटी हॅटट्रिक घेतली आहे. म्हणजेच कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 47 हॅटट्रिक झाल्या आहेत.
हेही वाचा :