MI vs DC Live Score IPL 2024 : IPL 2024 चा 43 वा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 10 धावांनी पराभव केला. अरुण जेटली स्टेडियमवर मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीनं 20 षटकांत 4 गडी गमावून 257 धावा केल्या. मुंबईनंही चुरशीची लढत दिली, पण संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 247 धावा करता आल्या.
जॅक फ्रेजर-मगार्कची जबरदस्त खेळी : दिल्लीकडून जॅक फ्रेजर-मगार्कनं 27 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या खेळीत त्यानं 11 चौकार आणि 6 षटकार मारले. ट्रिस्टन स्टब्सनं 47 आणि शाई होपनं 41 धावा केल्या. मुंबईतर्फे ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, पियुष चावला आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
मुंबईकडून तिलक वर्माच्या सर्वाधिक धावा : मुंबईकडून तिलक वर्मानं 63, हार्दिक पांड्यानं 46 आणि टीम डेव्हिडनं 37 धावा केल्या. सूर्यकुमार यादव 26 धावा करून बाद झाला, तर इशान किशन 20 धावा करून बाद झाला. दिल्लीकडून रसिक सलाम आणि मुकेश कुमारनं ३-३ बळी घेतले. खलील अहमदलाही २ यश मिळाले.
या मोसमात हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना मुंबईनं 29 धावांनी जिंकला होता. मुंबई इंडियन्स संघानं आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. तर दिल्लीचा संघ नऊ सामन्यांत चार विजयांसह सहाव्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग 11: हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.
दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग 11 : ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे/झाय रिचर्डसन, खलील कुमार अहमद, मुकेश.