ETV Bharat / sports

नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनं रचला इतिहास; भारताला जिंकवून दिलं दुसरं पदक - Paris Olympics 2024

author img

By ETV Bharat Sports Team

Published : Jul 30, 2024, 1:23 PM IST

Updated : Jul 30, 2024, 2:05 PM IST

PARIS OLYMPICS 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने दुसरे पदक जिंकलं आहे. भारताचे स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं आहे.

PARIS OLYMPICS 2024
PARIS OLYMPICS 2024 (Etv Bharat)

पॅरिस PARIS OLYMPICS 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने दुसरे पदक जिंकले आहे. भारताचे स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

मनू भाकरनं इतिहास रचला : 22 वर्षीय मनू भाकरने या विजयासह इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिक दोन पदके जिंकणारी ती भारताची पहिली नेमबाज ठरली आहे. याआधी रविवारी मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल महिला एकेरीत कांस्यपदक जिंकून भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक मिळवून दिलं होतं. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकता आलेली नाहीत. यासोबतच सरबज्योत सिंग आता ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा सहावा भारतीय नेमबाज ठरला आहे. उल्लेखनीय म्हणजे, भाकरने या सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि 13 पैकी 10 शॉट्समध्ये 10.0 किंवा त्याहून अधिक धावा केल्या.

भारतीय जोडीनं अंतिम फेरीत कोरियन जोडीचा 16-10 अशा फरकानं पराभव केला. भारतीय खेळाडूंनी संपूर्ण सामन्यात आपलं वर्चस्व कायम राखलं आणि चमकदार कामगिरी केली.

पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन : भारताच्या या शानदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांंचं अभिनंदन केलं आहे. पीएम मोदींनी सोशल मिडिया एक्सवर लिहिलं की, "आमचे नेमबाज सतत आमचा अभिमान वाढवत आहेत. ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचे अभिनंदन. दोघांनी उत्तम कौशल्य दाखवल आहे. मनू भाकरचं हे सलग दुसरं ऑलिम्पिक पदक आहे."

हेही वाचा

  1. मनिका बत्राने रचला इतिहास; ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला - Paris Olympics 2024
  2. शेतमजुराच्या मुलाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची हुलकावणी; उपांत्यपूर्व सामन्यात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या प्रवीणची संघर्षमय कहाणी - PARIS OLYMPIC 2024
  3. भारतीय तिरंदाजांचे 'तीर' भरकटले; उपांत्यपूर्व सामन्यात तुर्कीकडून पराभव - Paris Olympics 2024
  4. अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या मिनिटाला गोल करत भारतीय पुरुष हॉकी संघाची अर्जेंटिनाशी बरोबरी - Paris Olympics 2024

Last Updated : Jul 30, 2024, 2:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.