ETV Bharat / sports

'कॅप्टन कूल'चा पत्नी साक्षीबरोबर 43 वा वाढदिवस साजरा, 'या' सुपरस्टारनं सेलिब्रेशनला हजर राहून दिल्या खास शुभेच्छा - MS Dhoni Birthday - MS DHONI BIRTHDAY

Mahendra Singh Dhoni Turns 43 : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनी अर्थात माहीचा आज (7 जुलै) 43 वा वाढदिवस आहे. या निमित्तानं विविध स्तरातून माहीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचं पाहायला मिळतंय.

Mahendra Singh Dhoni turns 43 today Birthday wishes from Nitin Gadkari, Salman Khan and many others
एमएस धोनी वाढदिवस (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 8:08 AM IST

हैदराबाद Mahendra Singh Dhoni Turns 43 : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी अर्थातच माही आज (7 जुलै) आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कुल माहीला 'हेलिकॉप्टर शॉट'चा जनक म्हणून ओळखलं जातं. कर्णधार, फलंदाज, यष्टीरक्षक यातील त्याच्या यशस्वी कामगिरीमुळं तो कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला.

आज वाढदिवसानिमित्त माहीवर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महेंद्रसिंह धोनीनं पत्नी साक्षीबरोबर केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी अभिनेता सलनमान खानदेखील सेलिब्रेशनसाठी हजर होता. क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज एकाचवेळी पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. कॅप्टनसाहेब, वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणत सलमान खानने एक्स मीडियावरदेखील पोस्ट केली आहे.

कारकीर्द : एमएस धोनीचा जन्म 7 जून 1981 रोजी रांची, बिहार (आता झारखंड) येथे झाला. आपल्या मेहनती, प्रतिभा आणि उत्कटतेनं माहीनं लहान शहरातील असूनही मोठी कामगिरी केली. 43 वर्षीय माहीनं आतापर्यंत भारतासाठी 350 एकदिवसीय 98 टी-20 सामने खेळले असून त्यानं अनुक्रमे 10773 आणि 1617 धावा केल्या आहेत. 2005 ते 2014 या कालावधीत त्यानं 90 कसोटी सामने खेळले. या प्रकारात त्यानं 4876 धावा ठोकल्या. तर कोट्यवधी भारतीयांची मनं जिंकणाऱ्या माहीनं 15 ऑगस्ट 2020 रोजी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

शेवटचा सामना : आपला शेवटचा एकदिवसीय सामना माहीनं 2019 विश्वकप स्पर्धेत न्यझीलंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्यानं 72 चेंडूंत एक चौकार आणि एक षटकारासह 50 धावा केल्या होत्या. तसंच माहीनं आपला शेवटचा टेस्ट सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबर 2014 मध्ये खेळला होता. या सामन्यात त्यानं पहिल्या डावात 11 तर दुसऱ्या डावात 24 धावा केल्या होत्या. फेब्रुवारी 2019मध्ये त्यानं शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्यानं 23 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीनं एकूण 40 धावा केल्या होत्या.

विविध स्तरातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव : माहीला नेहमीच आपला वाढदिवस साधेपणानं साजरा करणं आवडतं. परंतु, माहीचा वाढदिवस येण्यापूर्वीच चाहते तो साजरा करण्यास सुरुवात करतात. माहीचा वाढदिवस खास बनवण्यासाठी यंदाही चाहत्यांनी बरीच तयारी केल्याचं बघायला मिळतंय. त्याचबरोबर माहील वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची प्रक्रिया सोशल मीडियावरही सुरू झाली आहे. बॉलिवूडपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी माहीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्या दिल्या आहेत. अभिनेता सलमान खाननं धोनी सोबतचा फोटो आपल्या एक्स अकाउंटवर शेअर करत 'हॅप्पी बर्थडे कप्तान साहब!', असं म्हटलंय. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील एक्सवर पोस्ट शेअर करत माहीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा -

  1. माहीच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण, पत्नीनं खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा - MS DHONI SAKSHI WEDDING ANNIVERSARY

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.