बंगळुरु Mayank Yadav : भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या 'स्पीडस्टार'नं प्रवेश केलाय. हा 21 वर्षांचा गोलंदाज सतत 150 च्या वेगाने गोलंदाजी करण्यात पटाईत आहे. मंगळवारी या गोलंदाजानं 157 च्या वेगानं चेंडू फेकून सर्वांना आश्चर्यचकित केलं. आता तुम्ही विचार करत असाल की, हा परदेशी गोलंदाज असावा, तर हा परदेशी नसून एक भारतीय गोलंदाज आहे. हा खेळाडू आयपीएल 2024 मधील लखनौ सुपर जायंट्स संघाचा खेळाडू आहे.
कोण आहे गोलंदाज : मयंक यादव असं या 21 वर्षीय गोलंदाजाचं नाव आहे. मयंकनं शनिवारी पंजाब किंग्जविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात मयंक त्याच्या वेगामुळं प्रकाशझोतात आला. तेव्हापासून प्रत्येकाला या गोलंदाजाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. मयंकनं पंजाबविरुद्धच्या त्याच्या पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या. त्यानं जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या दमदार कामगिरीमुळं मयंकला सामनावीरचा पुरस्कारही मिळाला होता.
मंगळवारी झालेल्या सामन्यात घेतल्या 3 विकेट : त्यानं मंगळवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यातही त्यानं तब्बल 156.7 किलोमीटर प्रतितास वेगानं चेंडू टाकला. या सामन्यातही त्यानं तीन बळी घेत आरबीसीच्या फलंदाजीचं कंबरड मोडलं. त्यानं आरबीसीच्या कॅमेरुन ग्रीन, ग्लेन मॅक्सनेल आणि रजत पाटीदार यांना बाद केलं. विशेष म्हणजे रजत पाटीदारला तब्बल 156.7 किलोमीटर प्रतितास वेगानं चेंडू टाकत त्याला बाद केलं. यामुळं सर्वजण आश्चर्यचकित झाले.
मयंकची एकूण कामगिरी कशी : मयंकची एकूण चांगली कामगिरी झालीय. त्यानं 11 टी-20 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. या काळात एका सामन्यात 20 धावांत 3 बळी घेणं ही सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. तसंच मयंकनं 17 लिस्ट ए मॅचमध्ये 34 विकेट घेतल्या आहेत. तो प्रथम श्रेणी सामनाही खेळला आहे. यात त्यानं 2 बळी घेतले. मयंकनं लिस्ट ए मॅचमध्ये जम्मू-काश्मीरविरुद्ध 3 विकेट घेतल्या होत्या. नोव्हेंबर 2023 मध्ये अहमदाबादमध्ये हा सामना झाला होता.
मयंक यादवनं कोणता विक्रम मोडला : 21 वर्षीय मयंक यादव आपल्या पदार्पणाच्या सामन्यापासूनच खूप चर्चेत आहे. त्यानं आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यात सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. आपल्या पहिल्या सामन्यात मयंकनं पंजाब किंग्जविरुद्ध ताशी 155.8 किमी वेगानं चेंडू टाकला होता. आता मयंक यादवनंच त्याचा हा विक्रम मोडलाय. त्याच्या दुसऱ्या सामन्यात त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 156.7 किलोमीटर प्रतितास वेगानं चेंडू टाकला. आयपीएल 2024 मधील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू आहे.
आयपीएल 2024 चे सर्वात वेगवान चेंडू
- 156.7 KMPH - मयंक यादव (LSG विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
- 155.8 KMPH - मयंक यादव (LSG विरुद्ध पंजाब किंग्ज)
- 153.9 KMPH - मयंक यादव (LSG विरुद्ध पंजाब किंग्ज)
- 153.4 KMPH - मयंक यादव (LSG विरुद्ध पंजाब किंग्ज)
- 153 KMPH - नांद्रे बर्गर (RR विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स)
- 152.3 KMPH - जेराल्ड कोएत्झी (MI विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद)
- 151.2 KMPH - अल्झारी जोसेफ (RCB विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स)
- 150.9 KMPH - मथिशा पाथिराना (CSK विरुद्ध गुजरात टायटन्स)
कोण आहे मयंक यादव : आयपीएलच्या लिलावात मयंक यादवला लखनौ सुपर जायंट्सनं 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत ( Base Price) विकत घेतलं. मयंक देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचं प्रतिनिधित्व करतो. मयंक आतापर्यंत दिल्लीसाठी एक प्रथम श्रेणी सामना खेळलाय. यात त्यानं 2 बळी घेतले आहेत. याशिवाय मयंकनं 17 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 34 विकेट घेतल्या आहेत. तर 11 टी-20 सामन्यात त्याच्या नावावर 15 विकेट आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023-2024 च्या उपांत्य फेरीत मयंकनं दोन विकेट घेतल्या होत्या. परंतु, त्यानंतर दिल्ली संघ पंजाबकडून पराभूत झाला होता.
हेही वाचा :