ETV Bharat / sports

भारतीय संघ 46 धावांत गारद... मात्र न्यूझीलंडच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा लज्जास्पद विक्रम

बेंगळुरु कसोटी सामन्यात भारतीय संघ 46 धावांत सर्वबाद झाला. पण कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्या संघाची सर्वात कमी धावसंख्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

author img

By ETV Bharat Sports Team

Published : 2 hours ago

Lowest Score in Test Cricket History
न्यूझीलंड क्रिकेट संघ (IANS photo)

बेंगळुरु Lowest Score in Test Cricket History : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरु इथं खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाला. भारताची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतीय भूमीवर कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतीय संघाचे पाच फलंदाज शून्य धावांवर बाद झाले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीनं एकूण 5 बळी घेतले. तर विल्यम ओ'रुर्कला एकूण 4 बळी मिळाले.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या जात असलेल्या बेंगळुरु कसोटीनं भारताची खराब कामगिरी उघडकीस आणली, जिथं भारतीय संघ 46 धावांवर सर्वबाद झाला. पण कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्या संघाची सर्वात कमी धावसंख्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? तर 1955 मध्ये ऑकलंडमध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडनं कसोटी क्रिकेटमधील सर्वात लज्जास्पद विक्रम केला, जेव्हा संपूर्ण संघ केवळ 26 धावांवर बाद झाला. हा विक्रम आजही कायम आहे आणि कसोटी इतिहासातील सर्वात कमी सांघिक धावसंख्या मानली जाते.

न्यूझीलंडचा संघ कसा बिथरला? : या ऐतिहासिक सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा अवघ्या 27 षटकांत खुर्दा उडवला. न्यूझीलंडचे 5 फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. यातील सर्वात मोठी वयक्तिक खेळी फक्त 11 धावांची होती. इंग्लंडसाठी फ्रेडी ट्रुमन आणि जॉनी वॉर्डल यांनी घातक गोलंदाजी केली, ज्यामुळं न्यूझीलंडचा संपूर्ण डाव उद्ध्वस्त झाला. दुसऱ्या डावातही न्यूझीलंडचा संघ सावरु शकला नाही आणि सामना 8 गडी राखून गमावला.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावा करणारे सामने :

संघधावाषटकंरन रेटडावविरोधी संघमैदानदिनांककसोटी सामना क्रमांक
न्यूझीलंड2627.00.963इंग्लंडऑकलॅंड25 मार्च 1955टेस्ट # 402
दक्षिण आफ्रीका3018.4x51.914इंग्लंडगकेबरहा13 फेब्रुवारी 1896टेस्ट # 47
दक्षिण आफ्रीका3012.32.402इंग्लंडबर्मिंघम14 जून 1924टेस्ट # 153
दक्षिण आफ्रीका3522.4x51.844इंग्लंडकेपटाउन1 एप्रिल 1899टेस्ट # 59
दक्षिण आफ्रीका3623.21.541ऑस्ट्रेलियामेलबर्न12 फेब्रुवारी 1932टेस्ट # 216
ऑस्ट्रेलिया3623.01.562इंग्लंडबर्मिंघम29 मे 1902टेस्ट # 70
भारत3621.21.683ऑस्ट्रेलियाएडिलेड17 डिसेंबर 2020टेस्ट # 2396
आयर्लंड3815.42.424इंग्लंडलॉर्ड्स24 जुलै 2019टेस्ट # 2352
न्यूझीलंड4239.01.071ऑस्ट्रेलियावेलिंगटन29 मार्च 1946टेस्ट # 275
ऑस्ट्रेलिया4237.3x41.662इंग्लंडसिडनी10 फेब्रुवारी 1888टेस्ट # 27
भारत4217.02.473इंग्लंडलॉर्ड्स20 जून 1974टेस्ट # 740
दक्षिण आफ्रीका4328.2x42.263इंग्लंडकेपटाउन25 मार्च 1889टेस्ट # 32
बांगलादेश4318.42.301वेस्ट इंडीजनॉर्थ साउंड4 जुलै 2018टेस्ट # 2310
ऑस्ट्रेलिया4426.0x52.034इंग्लंडओव्हल10 ऑगस्ट 1896टेस्ट # 52
दक्षिण आफ्रीका4531.31.423ऑस्ट्रेलियामेलबर्न12 फेब्रुवारी 1932टेस्ट # 216
इंग्लंड4535.3x41.881ऑस्ट्रेलियासिडनी28 जानेवरी 1887टेस्ट # 25
न्यूझीलंड4519.22.321दक्षिण आफ्रीकाकेपटाउन2 जानेवरी 2013टेस्ट # 2069
भारत4631.21.461न्यूझीलंडबेंगळुरु16ऑक्टोबर 2024टेस्ट # 2555
इंग्लंड4619.12.404वेस्ट इंडीजपोर्ट ऑफ स्पेन25 मार्च 1994टेस्ट # 1257
न्यूझीलंड4732.31.442इंग्लंडलॉर्ड्स19 जून 1958टेस्ट # 455
दक्षिण आफ्रीका4747.1x41.492इंग्लंडकेपटाउन25 मार्च 1889टेस्ट # 32
वेस्ट इंडीज4725.31.843इंग्लंडकिंग्स्टन11 मार्च 2004टेस्ट # 1687
ऑस्ट्रेलिया4718.02.613दक्षिण आफ्रीकाकेपटाउन9 नोव्हेंबर 2011टेस्ट # 2016
पाकिस्तान4929.11.682दक्षिण आफ्रीकाजोहान्सबर्ग1 फेब्रुवारी 2013टेस्ट # 2072
इंग्लंड5133.21.533वेस्ट इंडीजकिंग्स्टन4 फेब्रुवारी 2009टेस्ट # 1906

भारताची तिसरी सर्वात कमी धावसंख्या : 17 ऑक्टोबर रोजी बेंगळुरु कसोटीतही भारतीय संघानं लज्जास्पद कामगिरी केली आणि अवघ्या 46 धावांत त्यांचा पराभव झाला. भारताची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. न्यूझीलंडच्या मॅट हेन्री आणि विल्यम ओरूर्के यांनी भारतीय फलंदाजांना टिकू दिलं नाही आणि भारताचे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले. कसोटी क्रिकेटचा हा इतिहास सांगतो की कधी कधी अनुभवी संघही अपेक्षेपेक्षा वाईट कामगिरी करतात, पण न्यूझीलंडचा 26 धावांचा विक्रम अजूनही सर्वात लाजिरवाणा आहे.

हेही वाचा :

  1. फलंदाजी की थट्टा...? भारतीय संघ 46 धावांत गारद; 92 वर्षाच्या भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 'असं' घडलंच नव्हतं
  2. कीवी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांची शरणागती, 46 धावांत खुर्दा; 11 पैकी 5 खेळाडू शून्यावर आउट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.