कोलकाता KKR vs RCB Live score IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) रविवारी इंडियन प्रीमियर लीग T20 च्या रोमहर्षक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) एका धावानं पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरनं आरसीबीचा डाव 221 धावांवर रोखला. आरसीबीसाठी विल जॅकनं 55 तर रजत पाटीदारनं 52 धावांचं योगदान दिलं. केकेआरकडून आंद्रे, रसेलनं तीन तर हर्षित राणा, सुनील नारायण यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी : प्रथम फलंदाची करताना फिल सॉल्ट तसंच सुनील नारायण या सलामी जोडीनं KKR ला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 26 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. सॉल्टनं तुफानी फलंदाजी करताना सर्वाधिक धावा केल्या. सॉल्टनं लॉकी फर्ग्युसनच्या एकाच षटकात 28 धावा ठोकल्या, पण मोहम्मद सिराजनं सॉल्टला पव्हेलियनचा रस्ता दाखवत अर्धशतक गाठण्यापासून रोखलं.
KKR ला 97 धावांत 4 धक्के : यानंतर KKR संघाला 97 धावांत 4 धक्के बसले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरनं संयमी खेळत मोसमातील पहिलं अर्धशतक झळकावलं, परंतु अर्धशतकानंतर त्यानं आपली विकेटही गमावली. शेवटी, रमणदीप सिंगच्या वेगवान खेळीमुळं केकेआरनं आरसीबीसमोर धावांचा डोंगर उभा केला. रमणदीपनं 9 चेंडूत 2 चौकार तसंच 2 षटकारांच्या मदतीनं नाबाद 24 धावा केल्या. आंद्रे रसेलनं रमणदीपला चांगली साथ दिली. रसेल 20 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 27 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आरसीबीकडून कॅमेरून ग्रीन तसंच यश दयाल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
RCB नं केला संघात बदल : दरम्यान, KKR तसंच RCB या वर्षी दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. या दोघांमधील पहिला सामना केकेआरनं जिंकलाय. RCBनं या सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये तीन बदल केले आहेत, तर KKR नं संघात कोणताही बदल केलेला नाही. कॅमेरून ग्रीन, मोहम्मद सिराज तसंच कर्ण शर्मा यांना RCB नं संघात स्थान दिलं आहे.
कोलकाता नाईट रायडर्स इलेव्हन 11 : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इलेव्हन 11 : फाफ डूसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (ष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज.
KKR vs RCB : KKR तसंच RCB संघात आतापर्यंत IPL मध्ये 33 सामने खेळले गेले. यापैकी कोलकातानं 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तसंच बेंगळुरूनं 14 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, ईडन गार्डन्सवर दोन्ही संघांमध्ये 11 सामने खेळले गेले आहेत. यापैकी कोलकातानं 7 सामने, तर बेंगळुरूनं 4 सामने जिंकले आहेत.