ETV Bharat / sports

IPL आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी टीम डेव्हिड आणि किरॉन पोलार्डला दंड - IPL 2024

Tim David Kieron Pollard Fines : आयपीएल 2024 मध्ये बीसीसीआयनं मुंबई इंडियन्सचे किरॉन पोलार्ड तसंच टीम डेव्हिड यांच्यावर कारवाई केलीय. दोन्ही खेळाडूंना 20 टक्के दंड ठोठावण्यात आलाय. वाचा काय आहे प्रकरण...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 5:40 PM IST

Tim David, Kieron Pollard Fines
Tim David, Kieron Pollard Fines

नवी दिल्ली Tim David Kieron Pollard Fines : भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात 'बीसीसीआय'नं मुंबईचे प्रशिक्षक आणि फलंदाज टीम डेव्हिडवर कारवाई केलीय. पंजाब किंग्ज विरुद्ध मुल्लानपूर येथे गुरुवारी झालेल्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी टीम डेव्हिड आणि किरॉन पोलार्ड यांना दंड ठोठावण्यात आलाय. नियमांचं उल्लंघन झाल्याचं दोघांनीही मान्य केलंय.

आयपीएल आचारसंहितेचं उल्लंघन : 18 एप्रिल रोजी मुल्लानपूर येथे पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स संघाच्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आलाय. बीसीसीआयनं म्हटलं आहे की, "डेव्हिड आणि पोलार्डनं आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2,20 अंतर्गत लेव्हल 1 चे उल्लंघन केलंय. त्यामुळं त्यांना 20% दंड ठोठावण्यात आलाय."

डेव्हिड आणि पोलार्ड यांनी आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.20 अंतर्गत लेव्हल 1 चं उल्लंघन केलंय. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. लेव्हल 1 च्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास सामनाधिकाऱ्याचा निर्णय बंधनकारक आहे - बीसीसीआय

कशामुळं ठोठावला दंड : आचारसंहितेचा भंग कशामुळं झाला? हे बीसीसीआयनं स्पष्ट केलं नाहीय. मात्र, पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्यात अर्शदीप सिंगनं ऑफ साईडला चेंडू टाकला, जो वाइड चेंडू होता, पण अंपायरनं तो वाइड दिला नाही. यानंतर लगेचच, किरॉन पोलार्डनं बाहेर बसलेल्या सूर्यकुमारकडं हातवारे केले, तर टीम डेव्हिडनंही त्याची पुनरावृत्ती केली. त्यानंतर त्या चेंडूला वाइड देण्यात आलं. त्यामुळं त्यांना दंड ठोठावल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.15 (बी) नुसार खेळाडू, संघ अधिकाऱ्यांसाठी, मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूला सामना सुरू असताना मैदानाबाहेरील कोणत्याही व्यक्तीची मदत घेण्यास मनाई आहे.

हे वाचलंत का :

  1. लखनऊच्या 'नवाबां'समोर चैन्नईचे 'किंग्स' फेल; लखनऊनं घरच्या मैदानावर चेन्नईचा 8 विकेटनं उडवला धुव्वा - LSG vs CSK
  2. सूर्याच्या झंझावातानंतर कोएत्झी-बुमराहच्या गोलंदाजीसमोर पंजाबचे फलंदाज 'गुमराह'; पंजाबच्या घरात मुंबईचा विजयी 'भांगडा' - PBKS vs MI
  3. 16 वर्षांचं झालं आयपीएल! पहिल्याच सामन्यात ब्रेंडन मॅक्युलमच्या दीडशतकी खेळीमुळं केकेआरनं आरसीबीवर केली होती 'दादा'गिरी - Happy Birthday IPL

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.