गॉल Kamindu Mendis Record : श्रीलंकेचा फलंदाज कामिंडू मेंडिसनं आपल्या फलंदाजीनं जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ माजवली आहे. त्यानं आपल्या कसोटी कारकिर्दीतील अवघ्या 13व्या डावात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्यानं ही कामगिरी केली आहे. श्रीलंकेनं पहिला डाव 602 धावांवर घोषित केला. या सामन्यात मेंडिसनं नाबाद 182 धावा करत इतिहास रचला आहे.
THE HISTORIC MOMENT...!!! 🫡
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2024
- Kamindu Mendis became the 2nd joint fastest to 1,000 Test runs with a SIX. 🤯pic.twitter.com/fnZE4fcKCy
सर डॉन ब्रॅडमनची बरोबरी : कमिंडू मेंडिसनं आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी केली आहे. मेंडिसनं आपल्या कारकिर्दीतील 13व्या डावात ही कामगिरी केली आणि डॉन ब्रॅडमननेही आपल्या कसोटी कारकिर्दीत 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 13 डाव घेतले. तथापि, सर्वात जलद 1,000 धावा करण्याचा विक्रम संयुक्तपणे इंग्लंडचा हर्बर्ट सटक्लिफ आणि वेस्ट इंडीजचा ईडी वीक्स यांच्या नावावर आहे, ज्यांनी 12 डावांत 1,000 धावा पूर्ण केल्या आहेत.
8 सामन्यांत 5 शतकं आणि 4 अर्धशतकं : कामिंडू मेंडिसनं जुलै 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळून कसोटीत पदार्पण केलं, ज्यात त्यानं 61 धावा करत अर्धशतक झळकावलं. पण 2024 मध्ये श्रीलंकेच्या संघात पुनरागमन केल्यानंतर त्याच्या फलंदाजीनं धुमाकुळ घातलाय. मेंडिसनं आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 8 कसोटी सामने खेळले आहेत, ज्याच्या 13 डावांमध्ये त्यानं 5 शतकं आणि 4 अर्धशतकं झळकावली आहेत. मेंडिसच्या उत्कृष्ट आकडेवारीवरुन असं दिसून येते की तो प्रत्येक 3 डावांपैकी जवळपास 2 डावांमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करतो.
KAMINDU MENDIS JOINS DON BRADMAN.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2024
- Kamindu becomes the 2nd joint fastest to 1,000 runs in Test cricket. 🤯 pic.twitter.com/3YZWDnAfgn
आशियाई रेकॉर्ड तोडला : कमिंडू मेंडिस आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा आशियाई फलंदाज बनला आहे. त्याच्याआधी, भारताच्या विनोद कांबळीनं 14 डावांत 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या आणि आतापर्यंत तो आशियाई फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर होता. पण आता मेंडिसनं सर्वात जलद हजार कसोटी धावा करणारा आशियाई फलंदाज होण्याचा विक्रमही केला आहे.
हेही वाचा :